Jump to content

संख्याशास्त्र दिन

प्रसंत चंद्र महालनोबीस यांच्या सन्मानार्थ भारतात २९ जून रोजी संख्याशास्‍त्र दिन साजरा केला जातो. प्रशांत चंद्र महालनोबिस हे भारतीय संख्याशास्त्रज्ञ होते. त्यांनी भारताचा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत (१९५६-६१) उद्योगीकरणाची रचना तयार केली, ज्याला ‘महालनोबीस प्रारूप’ असे म्हणतात. महालनोबीस यांनी दोन सामग्री संचाची तुलनात्मक गणना करण्यासाठी मापन तयार केले, ज्यास ‘महालोबनीस अंतर गणना’ म्हणून ओळखले जाते. तसेच त्यांनी वेगवेगळ्या गटातील लोकांच्या सामाजिक व आर्थिक परिस्थितीची तुलना करण्यासाठी ‘भाजक आलेखी विश्लेषण’ ही संख्याशास्त्रीय पद्धत तयार केली. आर्थिक नियोजन व संख्याशास्त्रीय विकास या क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन भारत सरकारने २९ जून हा त्यांचा जन्मदिन ‘संख्याशास्त्र दिन’ म्हणून घोषित केला. राष्ट्रीय पातळीवर दरवर्षी हा दिवस ‘संख्याशास्त्र दिन’ म्हणून विशेष दिन साजरा केला जातो.