संकेत कोर्लेकर
| संकेत कोर्लेकर | |
|---|---|
| जन्म | संकेत अविनाश कोर्लेकर २९ एप्रिल, १९९४ अलिबाग, रायगड जिल्हा, महाराष्ट्र, भारत |
| राष्ट्रीयत्व | भारतीय |
| कार्यक्षेत्र | अभिनेता |
| कारकीर्दीचा काळ | २०११ ते आजपर्यंत |
| भाषा | मराठी |
| प्रमुख नाटके | शिवबा, मराठी पाऊल पडते पुढे |
| प्रमुख चित्रपट | टकाटक, आय.पी.एस. |
| प्रमुख टीव्ही कार्यक्रम | डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा, सुख म्हणजे नक्की काय असतं!, अजूनही बरसात आहे |
| वडील | अविनाश कोर्लेकर |
| आई | श्रद्धा कोर्लेकर |
संकेत अविनाश कोर्लेकर (जन्म २९ एप्रिल १९९४) हे एक भारतीय अभिनेते आहेत. त्यांनी अनेक मराठी चित्रपट, नाटके आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये अभिनय केला आहे.[१][२][३]
सुरुवातीचे जीवन व शिक्षण
संकेत कोर्लेकर यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात २९ एप्रिल १९९४ रोजी रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे झाला. त्यांचे बालपण मुरुड-जंजिरा येथे गेले. त्यांचे वडील अविनाश कोर्लेकर हे एका कंपनीमध्ये मेन्टनन्स फिटर आहेत तर आई श्रद्धा कोर्लेकर ह्या अंगणवाडीमध्ये शिक्षिका आहेत.
त्यांचे शालेय शिक्षण रायगड जिल्ह्यातील रोह्यातील मंगलवाडी शाळेत झाले. त्यानंतर २०१५ मध्ये त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील राजेंद्र माने महाविद्यालयातून मध्ये अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले. अभिनयाचे शिक्षण रोह्यातील स्पंदन संस्थेमध्ये घेतले.
कारकीर्द
संकेत कोर्लेकर यांना अभिनयाचे धडे त्यांचे वडील अविनाश कोर्लेकर ह्यांच्या कडून मिळाले. त्यांनी रोह्यातील स्पंदन संस्थेतून पुढील अभिनयाचे शिक्षण व व्यवसायिक नाटके केली. २०११ मध्ये मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. अनेक वर्ष स्पंदन संस्थेसाठी महाराष्ट्र शासनाच्या बालराज्यनाट्य स्पर्ध्येमध्ये सलग तीन वेळा (२०१६-२०१८) उत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार मिळाला.[ संदर्भ हवा ] त्यांची सुरुवात गोळाबेरीज चित्रपटात चहावाला झंप्या अशी जुनियर आर्टिस्ट म्हणून झाली. अभिनय क्षेत्रात ओळख २०१९ सालच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा ह्या मालिकेतील भिवा ह्या भूमिकेने दिली. त्यानंतर त्यांनी विठू माऊली मालिकेमध्ये संत नामदेव व ह.म.बने तु.म.बने मालिकेतील जयेश पटेल ही भूमिका साकारली. नंतर टकाटक चित्रपटात त्यांनी आदित्य ही नकारात्मक भूमिका साकारली.[ संदर्भ हवा ]
अभिनय व भूमिका
कोर्लेकर यांनी अभिनय केलेले काही चित्रपट, नाटके व मालिका खालीलप्रमाणे आहेत.
नाटके
| वर्ष | शीर्षक | पात्र |
|---|---|---|
| २००३ | मराठी पाऊल पडते पुढे | विष्णू |
| २००६ | शिवबा | मध्यम वयीन शिवाजी महाराज |
मालिका
| वर्ष | शीर्षक | पात्र |
|---|---|---|
| २०१९ | ह.म.बने तु.म.बने | जयेश पटेल |
| २०१९ | डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा | भिवा/मध्यम वयीन बाबासाहेब आंबेडकर |
| २०२० | विठू माऊली | संत नामदेव |
| २०२० | सुख म्हणजे नक्की काय असतं! | पार्थ |
| २०२१ | अजूनही बरसात आहे | मल्हार |
| २०२२ | लेक माझी दुर्गा | वरुण |
| २०२४ | अंतरपाट |
चित्रपट
| वर्ष | शीर्षक | पात्र |
|---|---|---|
| २०१२ | गोळाबेरीज | झंप्या |
| २०१९ | टकाटक | आदित्य |
| आगामी | आय.पी.एस. |
संदर्भ
- ^ "बाबासाहेबांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता संकेत कोर्लेकरचा अनुभव!". ६ डिसेंबर २०१९. 2021-04-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-12-16 रोजी पाहिले.
- ^ "डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेतील भिवाची भूमिका साकारणाऱ्या संकेतचा थक्क करणारा जीवन प्रवास..." २७ जानेवारी २०२०. 2020-11-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-12-16 रोजी पाहिले.
- ^ "शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी १०० वर्षांपूर्वी लिहून ठेवले आहे – प्रा. हरी नरके | Pimpri Chinchwad Bulletin". १४ ऑक्टोबर २०१९.