षांतोंग
| षांतोंग 山东省 | |
| चीनचा प्रांत | |
षांतोंगचे चीन देशामधील स्थान | |
| देश | |
| राजधानी | चीनान |
| क्षेत्रफळ | १,५६,७०० चौ. किमी (६०,५०० चौ. मैल) |
| लोकसंख्या | ९,४०,००,००० (इ.स. २००८) |
| घनता | ६०० /चौ. किमी (१,६०० /चौ. मैल) |
| आय.एस.ओ. ३१६६-२ | CN-SD |
| संकेतस्थळ | http://www.sd.gov.cn/ |
षांतोंग (देवनागरी लेखनभेद: शांतोंग, षांदोंग, शांदोंग, षांतुंग; सोपी चिनी लिपी: 山东; पारंपरिक चिनी लिपी: 山東; पिन्यिन: Shāndōng) हा चीन देशाच्या पूर्व किनाऱ्यावरील प्रांत आहे. चीनान येथे षांतोंगाची राजधानी आहे. पीत नदीच्या अंतिम टप्प्यापाशी वसलेला या प्रांताचा चिनी संस्कृतीच्या ऐतिहासिक जडणघडणीत महत्त्वाचा वाटा आहे. चिनी संस्कृतीवर प्रभाव पाडणाऱ्या ताओ, चिनी बौद्ध, कन्फ्युशियन मतांच्या तत्त्वप्रणाली येथे घडल्या, विस्तारल्या. ताओ मतानुयायांसाठी तीर्थक्षेत्रासमान असणारा थाय षान हा पर्वत याच प्रदेशात पसरला आहे. कन्फ्यूशियसाचे जन्मगाव मानले जाणारे छूफू हे शहरदेखील षांतोंगातच आहे.
राजकीय विभाग
षांतोंग प्रांत एकूण १६ उप-प्रांतीय शहरांमध्ये विभागला गेला आहे.
| षांतोंगचे राजकीय विभाग' |
|---|
बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- षांतोंग शासनाचे अधिकृत संकेतस्थळ (चिनी मजकूर)
- [विकिट्रॅव्हल (इंग्लिश आवृत्ती) - षांतोंग पर्यटनाविषयी माहिती (इंग्लिश मजकूर)
| चीनच्या जनतेच्या प्रजासत्ताकाचे राजकीय विभाग | |||||||||
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| |||||||||