षटकार
षटकार क्रिकेटच्या खेळातील फटका आहे. गोलंदाजाने टाकलेला चेंडू फलंदाजाने त्याच्या बॅटीने टोलवून जमिनीला स्पर्श न करता सीमापार केल्यास षटकार जाहीर करून फलंदाजास सहा धावा देण्यात येतात.
एका षटकात सहा षटकार मारणारे फलंदाज :
वेस्ट इंडीज सर गारफील्ड सोबर्स यांनी इंग्लंडमध्ये १९६८ साली नॉटिंगहॅमशायरसाठी काउंटी सामन्यात खेळताना.
भारत रवी शास्त्री याने रणजी सामन्यात खेळताना.
दक्षिण आफ्रिका हर्शल गिब्जने एकदिवसीय विश्वकरंडकाच्या सामन्यात खेळताना.
भारत युवराज सिंगने ट्वेन्टी-ट्वेन्टी विश्वकरंडक स्पर्धेच्या सामन्यात खेळताना.
इंग्लंड लँकेशायरचा फलंदाज जॉर्डन क्लार्क याने इंग्लंडमध्ये स्कारबोरो येथे यॉर्कशायर संघाविरुद्ध खेळताना (२५ एप्रिल २०१३ रोजी).