Jump to content

श्वेता तिवारी

श्वेता तिवारी
श्वेता तिवारी
जन्म

४ ऑक्टोबर, १९८० (1980-10-04) (वय: ४३)

[][]
प्रतापगढ, उत्तर प्रदेश
राष्ट्रीयत्वभारत भारतीय
कार्यक्षेत्रअभिनय, मॉडेलिंग
कारकीर्दीचा काळ १९९९ ते आजतागायत
प्रमुख टीव्ही कार्यक्रम कसौटी जिंदगी की
वडील अशोक कुमार तिवारी
आई निर्मला तिवारी
पती
राजा चौधरी
(ल. १९९८; घ. २००७)
,
अभिनव कोहली
(ल. २०१३; विभक्त २०१९)
अपत्ये पलक चौधरी, रेयांश कोहली
धर्महिंदू

श्वेता तिवारी (जन्म: ४ऑक्टोबर १९८०) ही एक भारतीय अभिनेत्री आहे, जी हिंदी चित्रपट आणि दूरचित्रवाणीमध्ये काम करते.[] एकता कपूरची दैनंदिन कौटुंबिक मालिका 'कसौटी जिंदगी के' (२००१-०८) मधील मुख्य भूमिका 'प्रेरणा शर्मा बजाज' पासून श्वेता प्रसिद्धीस आली आणि त्यानंतर परवरिश (२०११-१३), बेगूसराय(२०१५-१६), आणि 'मेरे डॅड की दुल्हन' (२०१९-२०) यासह अनेक दूरचित्रवाणी मालिकांमध्ये ती दिसली.[][]


तिवारी यांनी बिग बॉस-४ (२०१०-११) आणि कॉमेडी सर्कस का नया दौरा (२०११) हे 'वास्तव प्रदर्शनी (रिअ‍ॅलिटी शो)' जिंकले.[]

वैयक्तिक जीवन

तिवारी आणि तिची मुलगी पलक (2012 मध्ये)

तिवारी यांनी इ.स. १९९७ मध्ये भोजपुरी अभिनेता राजा चौधरीशी लग्न केले. या जोडप्याला ८ ऑक्टोबर २००० रोजी पलक नावाची मुलगी झाली.[] लग्नाच्या नऊ वर्षानंतर इस २००६ मध्ये श्वेता ने घटस्फोटासाठी अर्ज केला..[] तिने त्यात असे म्हणले की राजाच्या दारू आणि मारझोडीने ती त्रस्त झाली आहे. तिने तक्रार केली की तो तिला दररोज मारहाण करत असे. तो तिच्या शोच्या सेटवर हजर व्हायचा आणि तिच्याशी गैरवर्तन करायचा.[][]

त्यानंतर तिवारी आणि अभिनेता अभिनव कोहली यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. जवळपास तीन वर्षांनी, १३ जुलै २०१३ रोजी या जोडप्याने लग्न केले. २७ नोव्हेंबर २०१६ रोजी या जोडप्याला रेयांश नावाचा मुलगा झाला.[१०][११][१२] २०१७ साली या जोडप्याच्या वैवाहिक जीवनातील वादविवाद जाहीर झाले. ऑगस्ट २०१७ साली तिवारी ने कोहलीविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली. त्यात कोहलीने तिचा आणि तिच्या मुलीचा छळ केल्याचा आरोप केला. कोहलीला पोलिसांनी अटक केली आणि इ.स. २०१९ मध्ये हे जोडपे विभक्त झाले.[१३][१४][१५][१६]

अभिनय

दूरचित्रवाहिनी

इस १९९९ मध्ये तिवारी प्रथम दूरदर्शन मालिका 'कालीरेन' मध्ये काम केले. दूरदर्शनचे नंतर डीडी-१ असे नामकरण झाले. त्यानंतर तिला तिचा दुसरा प्रकल्प 'आने वाला पल' मिळाला, ज्याचे प्रसारण दूरदर्शन २ म्हणजेच डीडी मेट्रो वर झाले. नंतर तीने 'कही किसी रोज' या दूरचित्रवाहिनी मालिकेत काम केले. त्यानंतर इस २००१ मध्ये आलेल्या आणि २००८ पर्यंत चाललेल्या 'कसौटी जिंदगी के' मालिकेत तिने प्रेरणाची मुख्य भूमिका साकारली. या भूमिकेतून तिवारी प्रसिद्धीच्या झोतात आली[१७]

श्वेता तिवारी 'बिग बॉस-४' मध्ये विजेती ठरली तो प्रसंग

इस २०१० मध्ये तिवारी वास्तव प्रदर्शनी (रिअलिटी शो) 'बिग बॉस'च्या चौथ्या सीझनमध्ये सहभागी झाली होती. ८ जानेवारी २०११ रोजी तिला या कार्यक्रमात विजेती म्हणून घोषित करण्यात आले, 'बिग बॉस' स्पर्धा जिंकणारी ती पहिली महिला ठरली.[१८][१९] २०१३ मध्ये तिने 'परवरिश - कुछ खट्टी कुछ मीठी' - मध्ये स्वीटी अहलुवालियाची भूमिका साकारली. २०१५ मध्ये तिने 'बेगूसराय' या मालिकेत बिंदिया राणीची भूमिका केली.[२०]

चित्रपट

श्वेता तिवारी ने प्रामुख्याने हिंदी सह, भोजपुरी पंजाबी, कन्नड आणि उर्दू भाषेतील चित्रपटात सुद्धा काम केले. ३ फेब्रुवारी २०१२ रोजी प्रदर्शित भरत जाधव यांची प्रमुख भूमिका असलेला मिलिंद कवडेचा मराठी चित्रपट येड्यांची जत्रा मध्ये पाहुणी कलाकार म्हणून एक लावणी नृत्य केले.[२१]

भारतीय चित्रपटाव्यतिरिक्त तिवारी ने दोन विदेशी चित्रपटात देखील काम केले आहे; नेपाळी चित्रपट 'त्रिनेत्र' आणि उर्दू भाषेतील पाकिस्तानी चित्रपट 'सल्तनत' अशी त्यांची नावे आहेत.[२२][२३]

अभिनय संचिका

दूरचित्रवाहिनी

वर्ष मालिका भूमिका संदर्भ
१९९९ कलीरें मुलगी
२००० आने वाला पल अनु
२००१ कहीं किसी रोज़ शनाया शानू सिंघल / सुनीता मेनन
२००१ - २००८ कसौटी जिंदगी की प्रेरणा शर्मा / प्रेरणा ऋषभ बजाज / प्रेरणा अनुराग बसु
२००२ क्या हदसा क्या हकीकत सुनीता मेनन
२००२ कुमकुम - एक प्यारा सा बंधन पाहुणी कलाकार (प्रेरणाच्या भूमिकेत)
२००३ क्यूंकी सास भी कभी बहू थी पाहुणी कलाकार (प्रेरणाच्या भूमिकेत)
२००३ खिचड़ी पाहुणी कलाकार (प्रेरणाच्या भूमिकेत)
२००४ कहानी घर घर की पाहुणी कलाकार (प्रेरणाच्या भूमिकेत)
२००४ कहीं तो होगा पाहुणी कलाकार (प्रेरणाच्या भूमिकेत)
२००५ केसर पाहुणी कलाकार (प्रेरणाच्या भूमिकेत)
२००५ काव्यांजलि पाहुणी कलाकार (प्रेरणाच्या भूमिकेत)
२००५ दोस्त मशाल
२००६ नच बलिए 2 स्पर्धक
२००६ कैंडी फ्लॉस पाहुणी कलाकार
२००६ करम अपना अपना पाहुणी कलाकार (प्रेरणाच्या भूमिकेत)
२००७ कस्तूरी पाहुणी कलाकार (प्रेरणाच्या भूमिकेत)
२००७ कयामत पाहुणी कलाकार (प्रेरणाच्या भूमिकेत)
२००७ झूम इंडिया स्पर्धक
२००७ नागिंण रानी सुरमाया
२००८ राजा की आएगी बारात पाहुणी कलाकार (प्रेरणाच्या भूमिकेत)
२००८ किस देश में है मेरा दिल पाहुणी कलाकार (प्रेरणाच्या भूमिकेत)
२००८ सपना बाबुल का... बिदाई पाहुणी कलाकार (प्रेरणाच्या भूमिकेत)
२००८ अजीब पाहुणी कलाकार
२००८ जलवा फोर 2 का 1 पाहुणी कलाकार
२००८-२००९ जाने क्या बात हुई आराधना सरीन
२००९ यह रिश्ता क्या कहलाता है पाहुणी कलाकार
२००९ सीता और गीता राकाची ड्रीम गर्ल
२००९ इस जंगल से मुझे बचाओ स्पर्धक
२००९ झलक दिखला जा 3सूत्रसंचालन
२००९ आजा मही वयय रोनित रॉय आणि सरोज खान सह परीक्षक
२०१०-२०११ बिग बॉस-४ स्पर्शक (विजेता) [२४]
२०११ अदालत - कातिल मूर्ति रेवती अमृत नागपाल
२०११ सजन रे झूठ मत बोलो अर्चना
२०११ कॉमेडी सर्कस का नया दौर स्पर्धक
२०११-२०१३ परवरिश - कुछ खट्टी कुछ मीठी स्विटी
२०१२ बिग बॉस-६ पाहुणी कलाकार
२०१२ - २०१५ रंगोली प्रस्तुतकर्ता
२०१३ एक थी नायका जूही
२०१३ झलक दिखला जा 6 स्पर्धक
२०१३ - २०१५ कॉमेडी नाइट्स विद कपिल विविध पात्र
२०१४ मैड इन इंडिया श्वेता तिवारी
२०१५ बाल वीर महाभस्म परी
२०१५-२०१६ बेगूसराय बिंदिया प्रियम ठाकुर
२०१९ हम तुम और थेम शिवा
२०१९ - २०२० मेरे डैड की दुल्हन गुनीत सिक्का <[]
२०२० इंडियाज बेस्ट डांसर पाहुणी कलाकार
२०२१ फियर फैक्टर: खतरों के खिलाड़ी ११ स्पर्धक

चित्रपट

एनडीटीवी ग्रीनाथॉनच्या शो मध्ये यश राज स्टूडियोत नृत्य करताना श्वेता तिवारी
वर्ष चित्रपट भूमिका भाषा Notes
२००४मदहोशीतबस्सुमहिंदी
२००४आबरा का डाबराशिवानी आर. सिंहहिंदी
२००९अपनी बोली अपना देशसतकर कौरपंजाबी
२००९देवरुकन्नडविशेष उपस्थिति
२०१०बेनी एंड बबलूशीनाहिंदीविशेष उपस्थिति[२५]
२०११बिन बुलाये बारातीरज्जो / रोसीहिंदी
२०११मिलेना मिले हमहिंदीविशेष उपस्थिति[२६]
२०१२मैरिड 2 अमेरिकाप्रताप सिंहची पत्नीहिंदी
२०१२येड्यांची जत्रामराठीमसाला गीत
२०१३सल्तनतउर्दूपाकिस्तानी चित्रपट
२०१६त्रिनेत्रनेपाळीमुख्य अभिनेत्री

संदर्भ

  1. ^ Farzeen, Sana (4 October 2017). "Happy Birthday Shweta Tiwari: Salute to a woman who aced all her roles". The Indian Express. २८ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
  2. ^ a b "Shweta Tiwari birthday: Some facts about the 'Kasautii Zindagii Kay' actress". Times Now. 4 January 2018. २८ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
  3. ^ Farzeen, Sana (4 October 2017). "Happy Birthday Shweta Tiwari: Salute to a woman who aced all her roles". The Indian Express. २८ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
  4. ^ a b tubebite (2021-06-03). "श्वेता तिवारी 500 रुपए से शुरू करके आज बनी टीवी की बड़ी अभिनेत्री जानिए उनकी लाइफ, प्रति एपिसोड सेलरी Shweta Tiwari Biography In Hindi Wiki". tubebite (इंग्रजी भाषेत). 2021-08-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-09-29 रोजी पाहिले.
  5. ^ "Shweta Tiwari News: Latest News and Updates on Shweta Tiwari at News18". www.news18.com. २८ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
  6. ^ "Shweta Tiwari's daughter Palak turns 17, actor shares special birthday wish for her sweetheart". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 8 October 2017. २८ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
  7. ^ "Shweta files for divorce". The Telegraph – Calcutta. Calcutta, India. 21 June 2007. २८ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
  8. ^ "Shweta Tiwari, Dimpy Ganguly, Dalljiet Kaur – TV actresses who were victims of domestic violence". www.bollywoodlife.com. २८ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
  9. ^ "Raja Chaudhary gets bail after beating up Shweta Tiwari". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 27 January 2011. २८ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
  10. ^ Kavita Awaasthi (11 October 2012). "He sacrificed our daughter for property: Shweta Tiwari". The Hindustan Times. 15 October 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २८ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
  11. ^ "Shweta Tiwari gives birth to baby boy". indianexpress.com. 2 December 2016. २८ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
  12. ^ "Shweta Tiwari promises something beautiful to son Reyansh on his birthday, see photos". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 5 December 2017. २८ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
  13. ^ "All is not well between Shweta Tiwari and husband Abhinav Kohli?". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 16 October 2017. २८ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
  14. ^ "Shweta Tiwari files domestic violence case against husband Abhinav Kohli". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 12 August 2019. २८ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
  15. ^ "TV actor's daughter opens up about allegations against stepfather". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 13 August 2019. २८ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
  16. ^ "Shweta Tiwari on separation with 2nd husband: I will do what is right for my kids". India Today (इंग्रजी भाषेत). 12 October 2019. २८ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
  17. ^ "Happy Birthday to Shweta Tiwari; the original Prerna of Television Industry!". Free Press Journal (इंग्रजी भाषेत). 4 October 2018. २८ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
  18. ^ "Shweta Tiwari wins Bigg Boss 4". The Times of India (इंग्रजी भाषेत). 8 January 2011. २८ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
  19. ^ "Shweta Tiwari first woman to win 'Bigg Boss', takes home Rs.1 crore". Zee News (इंग्रजी भाषेत). 8 January 2011. २८ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
  20. ^ "Shweta Tiwari and Rupali Ganguly on Parvarish". in.com (इंग्रजी भाषेत). 24 September 2019 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २८ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
  21. ^ "Yedyanchi Jatra". imdb (इंग्रजी भाषेत). २८ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
  22. ^ "Shweta Tiwari" (इंग्रजी भाषेत).
  23. ^ "7 Lesser Known Facts About Hum Tum And Them Actress Shweta Tiwari" (इंग्रजी भाषेत).
  24. ^ BollyPluseofficial (2021-07-14). "Bigg Boss:श्वेता तिवारी रही बिग बॉस सीजन 4 की विनर". Bollypluse (इंग्रजी भाषेत). 2021-06-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-07-14 रोजी पाहिले.
  25. ^ BollyPluseofficial (2020-07-16). "Beni and Babloo Hindi Movie: Rajpal Yadav, Shweta Tiwari, Riya Sen". Bollypluse (इंग्रजी भाषेत). 2020-07-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-07-15 रोजी पाहिले.
  26. ^ "Shweta's item song". mid-day.com. २ ऑक्टोबर २०१३ रोजी मूळ पान पासून संग्रहित..

बाह्य दुवे