Jump to content

श्वेतलाना सावित्स्काया

श्वेतलाना सावित्स्काया
जन्म ८ ऑगस्ट १९४८ (वय ६८)
मॉस्को, सोवियत संघ
राष्ट्रीयत्व रशियन
वडील येवगेनिया सावित्स्काया

श्वेतलाना येवगेनिया सावित्स्काया(जन्म ८ ऑगस्ट १९४८) ही एक सोव्हिएत निवृत्त वैमानिक व अंतराळवीर आहे, जी १९८२ साली सोयुज टी-७ या यानामध्ये बसली, तसेच अंतराळात जाणारी दुसरी महिला आहे. १९८४ साली अंतराळात दोनदा जाणारी व स्पेसवॉक करणारी जगातील पहिली महिला बनली. तिने एक वैमानिक म्हणून एफएआयचे अनेक जागतिक विक्रम केले आहेत.[]


सुरुवातीचे जीवन

श्वेतलाना सावित्स्कायाचा जन्म ८ ऑगस्ट १९४८ रोजी मॉस्को, सोवियत संघ येथे झाला. श्वेतलानाचे वडील हे द्वितीय विश्वयुद्धाच्या काळात एक पायलट होते, नंतर त्यांनी सोव्हिएत हवाई संरक्षण दलाचे उप-प्रमुखपद पद भूषविले. श्वेतलाना ने वयाचा १६ व्या वर्षापासूनच पॅराशूट शिकण्यास सुरुवात केली, जेव्हा तिच्या वडिलांनी याबद्दल ऐकले तेव्हा त्यांनी या प्रवृत्तीस प्रोत्साहन दिले.[]

१९६६ मध्ये पदवीधर झाल्यानंतर तिने मॉस्को स्टेट एव्हिएशन इंस्टीट्यूट (एमएआय) मध्ये प्रवेश घेतला, जिथे तिने विमानाचे धडे ही घेतले. १९७१ मध्ये तिला फ्लाइट इन्स्ट्रक्टर म्हणून परवाना देण्यात आला. १९७६ मध्ये पदवीधर होताना ती Fedotov टेस्ट पायलट स्कूलमध्ये टेस्ट पायलट म्हणून प्रशिक्षित झाली. १९६९ ते १९७७ च्या दरम्यान तिने एरोबेटिक्स सोव्हिएत संघाची सदस्य म्हणून काम पाहिले. १९७२ च्या सॅलोन-डी-प्रोवंन्समधील जागतिक स्पर्धेत त्यांनी तिसरे स्थान पटकावले[]

अंतराळ प्रशिक्षण

१९७९ मध्ये, महिला अंतराळवीराचा दुसऱ्या गटाचा निवड प्रक्रिया प्रक्रियेत श्वेतलाना हिने भाग घेतला. जून १९८० रोजी तिला औपचारिकपणे अंतराळवीर समुहात प्रवेश दिला गेला, व फेब्रुवारी १९८२ रोजी तिने अंतराळवीर होण्यासाठीची परीक्षा उत्तीर्ण केली.

पहिले उड्डाण( सोयुज टी-७ )

डिसेंबर १९८१ मध्ये श्वेतलानाने आपल्या पाहिल्या स्पेस उड्डानासाठी तयारी केली. या मिशनचा कमांडर लियोनिद पोपोव्ह हा होता, फ्लाइट इंजिनिअर अलेक्झांडर सेरेब्रोव्ह हा होता. १९८२ साली सोयुज टी-७ हे यान अंतराळात झेपावले, १९ वर्षानंतर श्वेतलाना अंतराळात जाणारी जगातील दुसरी महिला ठरली. २७ ऑगस्ट १९८२ साली ते पृथ्वीवर परत आले.

दुसरे उड्डाण( सोयुज टी-१२ )

२५ जुलै १९८४ रोजी अंतराळात दोनदा जाणारी व स्पेसवॉक करणारी जगातील पहिली महिला बनली. २९ जुलै १९८४ रोजी ती पृथ्वीवर परत आली.

पुरस्कार

  • सोव्हिएत युनियन हिरो, दोनदा (१९८२, १९८४)
  • ऑर्डर ऑफ लेनिन, दोनदा (१९८२, १९८४)
  • विशेष पदक - अवकाशात स्पेस वॉक साठी
  • 16 सुवर्णपदके - यूएसएसआर खेळ

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Поиск - Search RSL". search.rsl.ru (रशियन भाषेत). 2018-07-27 रोजी पाहिले.
  2. ^ "A Cog in a Political Machine: The Career of Svetlana Savitskaya". AmericaSpace (इंग्रजी भाषेत). 2012-02-10. 2018-07-27 रोजी पाहिले.
  3. ^ "जब पहली बार आसमां में चली कोई महिला". aajtak.intoday.in (हिंदी भाषेत). 2018-07-28 रोजी पाहिले.