श्वार्त्सवाल्ड
श्वार्त्सवाल्ड (जर्मन: Schwarzwald; काळे जंगल) ही जर्मनी देशाच्या बाडेन-व्युर्टेंबर्ग राज्यातील एक पर्वतरांग आहे. ह्या डोंगररांगेतील बहुतांशी भाग पाइन वृक्षांच्या जंगलाने आच्छादल्यामुळे याला ब्लॅक फॉरेस्ट असे नाव पडले. पाइन वृक्षाची पाने अथवा सुया गडद हिरव्या रंगाची असल्याने त्याचे जंगल अतिशय गडद हिरवे दिसते. म्हणून ब्लॅक फॉरेस्ट असे नाव पडले आहे.
डॅन्यूब व नेकार ह्या दोन मोठ्या नद्यांचा उगम श्वार्त्सवाल्डमध्ये होतो. फ्रायबुर्ग हे छोटे शहर श्वार्त्सवाल्डच्या टोकाजवळ वसले आहे. पर्यटनासाठी श्वार्त्सवाल्ड एक लोकप्रिय स्थळ आहे.