श्री संभाजीराव पलांडे पाटील प्रगती हायस्कूल (मुखई)
श्री संभाजीराव पलांडे पाटील प्रगती हायस्कूल ही मुखई (तालुका शिरूर, जिल्हा पुणे) या गावातील माध्यमिक शाळा आहे. संभाजीराव पलांडे पाटील यांनी १९७७ साली या विद्यालयाची स्थापना ‘श्री कालभैरव शिक्षण प्रसारक मंडळ’ या संस्थेअंतर्गत केली. या विद्यालयामध्ये इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावी पर्यंत शिक्षण दिले जाते. विद्यालय हे शासकीय अनुदानित असून त्यामध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्याकडून पुरवला जाणारा अभ्यासक्रम मराठी आणि सेमी-इंग्लिश या भाषेमधून शिकवला जातो.
शाळेला मोठा परिसर लाभलेला आहे ज्याचा वापर विद्यार्थ्यांच्या खेळांसाठी केला जातो. ५ ते ८ च्या विद्यार्थ्यांना दुपारच्या सत्रात पोषण आहार दिला जातो.
विद्यालयातील अभ्यासक्रम
- इयत्ता ५ ते ७
या दरम्यान विद्यार्थ्यांना विज्ञान व गणित हे विषय इंग्रजीमधून व समाजशास्त्र हा विषय मराठी भाषेतून शिकवला जातो. आणि मराठी, हिंदी व इंग्रजी हे भाषा विषय शिकवले जातात.
- इयत्ता ८ ते १०
या इयत्तेमध्ये विद्यार्थ्यांना विज्ञान व गणित इयत्ता आठवीमध्ये इंग्रजीमधून आणि ९ ते १० मध्ये मराठीमधून शिकवले जाते. समाजशास्त्र हा विषय मराठी भाषेमधून शिकवला जातो. आणि मराठी, हिंदी व इंग्रजी हे भाषा विषय शिकवले जातात.
- आय. बी. टी.- विद्यालयामध्ये इयत्ता ८ ते १० मध्ये आय. बी. टी. म्हणजे मुलभूत तंत्रज्ञानाची ओळख हा विषय विज्ञान आश्रम, पाबळ यांच्या अंतर्गत कार्य शिक्षण म्हणून शिकवला जातो. यामध्ये एकूण चार विभाग आहेत.
१. अभियांत्रिकी २. उर्जा व पर्यावरण ३. शेती व पशुपालन ४. गृह-आरोग्य हे विषय आठवड्यातून तीन दिवस विद्यालयात प्रात्यक्षिकासहित शिकवले जातात.