श्री शिवाजी शिक्षण संस्था
१ जुले १९३२ रोजी 'श्री शिवाजी मराठा शिक्षण संस्थेची स्थापना पंजाबराव देशमुख यांनी केली.आरंभी कोणतेही पद त्यांनी संस्थेच्या कार्यकारिणीत घेतले नाही. एल.एम.महाजन,व्हि.के.देशमुख,गुलाबराव देशमुख,बी.वाय.भोपळे,व्हि.जी.ताकोडे आणि नगरकर या सर्वाची कार्यकारनी तयार केली.डिसेंबर १९३२ मध्ये संस्थेची नोंदणी केली.आणि बेरार मराठा एज्युकेशन सोसायटी कडुन अमरावतीचे श्री शिवाजी हायस्कुल या संस्थेने चालवायला घेतले.काशिराव बापु देशमुख,भाउसाहेब गुंड,एस.व्हि.देशमुख, ही मंडळी सुरुवातीपासुनच सोबत होती. पण पंजाबराव यांच्यामुळे ना.बा.पाटील,दादासाहेब वाटाने,नानासाहेब कोरडे गोविंदराव अश्रूजी पाटील सावरगाव कर असे प्रभावशाली व्यक्ती शिवाजी शिक्षण संस्थेशी जोड्ले गेले. ===