श्री देवी हायस्कूल
भंडारी एज्युकेशन सोसायटी (मालवण).मुंबई ज्ञानदायी संस्थेने "वडाचापाट".या ग्रामीण भागात जून १९८१ पासून इ.८ वी ते १० वी पर्यंतचे वर्ग विनाअनुदान या तत्त्वावर सुरू केले आहे. सदर वर्ग सुरू करताना संस्थेला अनेक दिव्यातून जावे लागले. शैक्षणिक संस्था सुरू करावयाची म्हणजे वर्गखोल्या शिक्षकवर्ग ,शैक्षणिकसुविधा या बाबत सोय करणे आवश्यक होते. या सर्व अडचणींना तोंड देऊन आपल्या शिरावर 'ना नफाना तोटा 'चा भार हसत हसत झेलून संस्थेने झोपडी वजा वर्ग खोल्यांचे चिरेबंदी सुसज्ज असे तीन साडेतीन लाखाचे बांधकाम करून वडाचापट मध्ये ग्रामस्थांना शिक्षकांना आशेचा किरण दाखवला. व याच इमारतीत वर्ग भरविण्यात आले. सन १९८९-१९९० मध्ये विद्यार्थांच्या पिण्याच्या पाण्याच्या सोयी करिता विद्यार्थांच्या ,ग्रामस्थांच्या ,शिक्षकांच्या श्रमदानाने विहीर खोदाईचे काम हाती घेतले. व या कार्यास संस्थेने पूर्ण पाठींबा व सहकार्य केले आहे. विहीर खोदाईसाठी लागणारे साहित्य व विद्यार्थ्यांच्या चहापाण्याकरिता रु.३०००/-पर्यंत आर्थिक सहाय्य केले आहे.
शाळेचा परिसर फार मोठा असल्याने चारही बाजूला आकेशिया व साग यांची जवळ जवळ २३०० झाडांची लागवड करण्यात आली आहे. राहता राहिली उणीव ती इमारतीच्या व खिडक्यांच्या झडपांची एकंदरीत ही इमारत परिपूर्ण नसल्याने या इमारतीत म्हणावा तितका सजीवपणा नव्हता आज सुधारणा होईल उद्या होईल असे म्हणता म्हणता जून १९८९ पासून शाळा १००% अनुदान तत्त्वावर आली. आणि ...सर्वांच्या उत्साहाला उधान आले. आणि त्याच वेळी नवीन कौन्सिल पदावर आले. संस्थेने लागलीच सन १९९०-९१ मध्ये इमारतीच्या दरवाजांना व खिडक्यांना झडपा लावण्याचे लावण्याचे काम हाती घेतले. हा हा म्हणता इमारतीचा रंग बदलू लागला. एका बाजूने इमारत सुसज्ज बनविणे व दुसऱ्या बाजूने शाळेच्या आवश्यक असलेल्या गरजा पुरविणे यांना महत्त्व दिले. शाळेतील विद्यार्थ्याना बसविण्यासाठी ब्यांचेस खरेदी करणे शिक्षकांसाठी टेबल खुर्ची खरेदी करणे कार्यालायाकरिता ,विज्ञानसाहित्याकरिता, ग्रंथालायाकरिता कपाटे खरेदी प्रयोगशाळा साहित्य क्रीडा साहित्य व ग्रंथालय साहित्य खरेदी करणे, शाळेत फोन व्यवस्था करणे इत्यादी करिता आर्थिक साहित्य संस्थेने केले.
सन १९९५-९६ मध्ये खोदाई केलेल्या विहिरीचे आणखी काही खोल खोदकाम करणे, विहिरीचा कठडा बांधकाम करणे इत्यादी कामे हाती घेऊन पूर्ण करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थांना मुबलक पाण्याचा पुरवठा उपलब्ध झाला. पाण्याच्या मुबलक सोईमुळे इमारतीच्या आवारात माडांच्या रोपांची व तुरळक आंबा कलमांची लागवड करण्यात आली. माहे नोंव्हे.१९९६ मह्डे या इमारतीला सजीवता आणण्याचे काम संस्थेने हाती घेतले. याकरिता लागणारी एक लाख रुपयांची तरतूद संस्थेच्या वतीने श्री.मिठबांवकर,नि.ल.मा.ऑन.जन.सेक्रेटरी ,कौन्सिल ऑफ मॅनेजमेंट यांनी अति परिश्रम घेऊन देणगीदार मिळविले. त्याचबरोबर श्री.डी.डी.कांबळी व कै.आबा साळगांवकर यांनी बहुमुल्य देणगी देऊन सहकार्य केले.
माहे डिसें.१९९६ मध्ये इमारतीला आतून व बाहेरून गिलावा करणे, जमिनीला कोबा घालणे, व्हरांड्याला ३ फुटी कठडा बांधणे तसेच स्टेजवजा शाळेचा प्रवेशभाग सुसज्ज बांधणे ,विद्यार्थी /विद्यार्थीनिसाठी मुताऱ्या बांधणे इत्यादी कामे पूर्ण केली. त्यानंतर इमारत पूर्णतः रंगविण्याचे काम हाती घेण्यात आहे. आवश्यक तेथे फळे तयार केले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे इमारतीला लाईट व्यवस्था करणे. या वर्षात लाईट व्यवस्थेसाठी प्रयन्न करून इमारतीस लाईट व्यस्था सुरू करून दिली. इमारतीच्या सर्व खोल्यामध्ये एक फॅन व कमीत कमी दोन ट्युब्स व बाहेरून बल्प बसविण्यात आले. या सर्व इमारतीस लागणारे सर्व इलेक्ट्रीक साहित्य श्री.पाटकर ,व्ही.डी.यांनी देणगी स्वरूपात पुरविले आहे. नोव्हें.१९९७ मध्ये या इमारतीस लाईट व्यवस्था सुरू झाली. तसेच सन १९९६-१९९७ मध्ये इमारतीस इमारत भाडे दाखला संस्थेच्या प्रयत्नाने मिळविला. सन १९९६-१९९७ मध्ये संस्थेने १००% अनुदानातून ५० आंबा कलम व १०० काजू कलमांची लागवड करण्याचे सुचविले त्याप्रमाणे ही लागवड पूर्ण करण्यात आली.
आज येथील परिसर पाहता शानदार इमारत व डवरलेली क्लेम मनाला व डोळ्यांना दिपवून टाकतात. संस्थेच्या या परिश्रमाचे फळ व संस्थेचे स्वप्न साकारलेले नजरेस जाणवते. संस्थेच्या या अमुल्य सहकार्याने वडाचापाट येथे शानदार ज्ञानसंस्था यशाच वस्त्र परिधान करून डौलाने उभी आहे.