श्री ज्ञान सरस्वती मंदिर, बासर
बासर हे ठिकाण तेलंगणातील निर्मल जिल्ह्यात असून महाराष्ट्रातील नांदेड - मुखेड -हैद्राबाद रस्त्यावर निजामाबाद पासून ३५ km हैद्राबाद पासून २०० km आदिलाबाद पासून १०८ km अंतरावर आहे . आदिलाबाद जिल्ह्याचे विभाजन करून नवीन निर्मल जिल्हा तयार करणेत आला आहे.
श्री सरस्वतींची मंदिरे भारतात तीनच ठिकाणी आढळून येतात. काश्मिरातील श्री वैष्णोदेवी, दुसरे शृंगेरी येथील शारदादेवी व तिसरे बासर येथील श्री ज्ञान सरस्वतींचे मंदिर आहे . श्री सरस्वतीचे एक रूप शृंगेरी येथील शारदापीठात गुप्तरूपाने वास करते म्हणून त्यालाच अर्धे पीठ म्हणले जाते.
येथे व्यास मुनींचे वास्तव्य होते.
असे म्हणतात महाभारत लेखनानंतर मनःशांतीसाठी व्यास मुनी मनाला शांतता लाभावी म्हणून दक्षिण तीर्थाटनास निघाले वाटेत त्यांना हे ठिकाण खूप आवडले म्हणून येथेच राहिले येथेच राहिले . आजही मंदिराच्या गाभाऱ्यातील असलेली मूर्ती व्यास प्रतिष्ठित वालुकेची मूर्ती आहे.