श्रीशैलम्
श्रीशैल्यम् मल्लिकार्जुन हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक मंदिर आहे. हैद्राबादपासून सुमारे २१० कि.मी. अंतरावर हे ठिकाण आहे. पूर्व दिशेला नल्लमलाई डोंगर रांगात वसलेले हे (शिव) तीर्थक्षेत्र आहे. याची समुद्र सपाटीपासूनची उंची ४७६ मीटर आहे. येथील जंगल सदाहरित प्रकारचे आहे. तसेच येथे कृष्णा नदीच्या (पाताळगंगेच्या) काठावर जाण्यासाठी रज्जूमार्ग आहे. येथे श्रीशैलम् धरण असून भव्य जलविद्युत निर्मिमीती केंद्र आहे.
कथा
येथे पूर्वी असलेल्या महाकाली मंदिरात नंदी तपस्या करत होता. या तपस्येत असलेल्या नंदीवर प्रसन्न होउन मल्लिकार्जुन आणि ब्रम्हरंभा रूपात शिव-पार्वती इथे प्रगट झाले.
इतिहास
श्रीशैलमचा इतिहास सातवाहन काळापर्यंत सापडतो. चौदाव्या शतकातील प्रोलया वेमा रेड्डी या राजाचा कार्यकाळ हा श्रीशैलमचा सुवर्णकाळ मानला जातो. राजा प्रोलयाने पाताळगंगा (कृष्णा नदी) ते श्रीशैलम असा मार्ग बांधला. या नंतर अतिशय ताकदवान अशा विजयनगर साम्राज्यात मुख्य मंदिराचे आणि दक्षिण टोकाकडील गोपुरांचे दगडी बांधकाम करण्यात आले. पुढे पंधराव्या शतकात विजयनगर साम्राज्य नावारूपास आणणारे राजा कृष्णदेवराय यांनी राजगोपुर आणि सलुमंतापस व इतर भागाचे निर्माण कार्य केले. इ.स १६६७ मधे छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहिमेच्या वेळी मंदिराच्या उत्तरेकडील गोपुराचे बांधकाम केले.