Jump to content

श्रीलक्ष्मी सुरेश

श्रीलक्ष्मी सुरेशचा जन्म ५ फेब्रुवारी १९९८ रोजी झाला.ती केरळमधील कोझिकोडे जिल्ह्यातील मुलगी आहे.तीचे वडील सुरेश मेनन आणि आई विजु सुरेश आहे. ती ३ वर्षाची असताना तिने कॉम्पुटरवर काम करण्यास सुरुवात केली.आणि ती ८ वर्षाची असताना तिने पहिली वेब साइड बनवली.श्रीलक्ष्मी सुरेश उच्च माध्यमिक विद्यालयात असताना तिने त्यांच्या विद्यालयाची वेब साइड तयार केली.त्याचे १५ जानेवारी २००७ला केरळ सरकारचे वन मंत्री बिनॉय विश्वम यांनी उदघाटन केले त्याच्यामाध्यमातून चालू केलेली इ डिझाईन २००९ मध्ये लाँच झाली. श्रीलक्ष्मी सुरेशला २००८ मध्ये असामान्य कार्यासाठी भारत प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी महिला बाल कल्याण मंत्रालयाने राष्टीय बाल पुरस्कार देऊन सन्मानित केले. तिला ५ जानेवारी २००९ला विज्ञान भवन,नवी दिल्ली मध्ये एका समारोहमध्ये सोनिया गांधीने हा सन्मान दिला.तिने आपल्या कार्याची एक वेगळी ओळख बनवली. वेबसाईट बनवणाऱ्या कंपनीची ती CEO आहे.श्रीलक्ष्मीला अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अवार्ड मिळालेले आहे.असोसिएशन ऑफ अमेरिकन वेबमास्टर या संस्थेची १८ वर्षापेक्षा कमी वय असणारी ती एकटीच सभासद आहे.आणि त्या संस्थेने तिला सर्वोच्च असा गोल्ड वेब अवार्ड पुरस्कार दिला आहे.[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Ace venture". The Hindu (इंग्रजी भाषेत). 2009-02-24. ISSN 0971-751X. 2018-07-24 रोजी पाहिले.