Jump to content

श्रीलंकेतील तमिळ संघर्ष

श्रीलंकेतील तमिळ संघर्ष तेथील तमिळभाषीय व्यक्तींनी वेगळा देश मागण्यासाठी केलेला उठाव होता. श्रीलंकेतील बहुसंख्य सिंहली आणि अल्पसंख्यांक तमिळ यांच्यात सुरू झालेला हा वांशिक संघर्ष सुमारे ४ दशके चालला. सुरुवातीला सांस्कृतिक फरक असणाऱ्या या लढ्याने नंतर सामाजिक, राजकीय व अखेर सशस्त्र संघर्ष असे रूप घेतले. हा लढा खासकरून लिट्टे (एल.टी.टी.ई.) आणि श्रीलंकेचे सैन्य यातील, त्यातही प्रभाकरन या लिट्टेच्या प्रमुखाभोवतीच जास्त फिरला. अखेरीस प्रभाकरनाच्या मृत्युने हा लढा संपुष्टात आला आहे. श्रीलंकेतील सध्याच्या सरकारने यापुढे तमिळांबाबत दुजाभाव बाळगला जाणार नसल्याचे आश्वासन आंतरराष्ट्रीय समुदायास दिले आहे. जागतिक राजकारणावर या लढ्याचे दूरगामी परिणाम आहेत. लिट्टेने गनिमी काव्याचे व दहशतीचे जे तंत्र वापरले त्यामुळे जागतिक दहशतवादात लिट्टेची दखल सतत घेतली

भारताची भूमिका

१९९१ साली लोकसभा निवडणुकांचा प्रचार सभे दरम्यान लिट्टे ने मानवी बॉम्बचा वापर करून राजीव गांधींची हत्या केली. "धनु" नावाची मुलगी राजीव गांधींचे सभास्थानी स्वागतासाठी जमलेल्या गर्दीत होती. राजीव गांधी जवळ येताच ती गर्दी तुन पुढे युण्याचा प्रयत्न करुअ लागली. तेव्हा राजीव गांधींच्या महिला सुरक्षारक्षकने तिला अडविले. पण राजीव गांधींनी त्या महिला रक्षकाला थांबवुन धनुला जवळ येऊ दिले. धनु राजीव गांधींच्या पाया पडण्यास वाकली आणि तिने आपल्या कमरेला असणारी स्फोटके उडवून दिली. यात तिचा, राजीव गांधींचा आणि जवळ उभ्या असणाऱ्या व्यक्तींचा मृत्यु झाला. लिट्टे ने सुरुवातीस जबाबदारी घेण्यास नकार दिला पण घटणास्थळाचे चित्रीकरण उपलब्ध झाल्यावर , इतर दहशतवाद्यांची ओळख पटवुन माग घेण्यात आला. यामुळे लिट्टेने भारताची उरली सुरली सहानुभुती ही गमावलीच शिवाय लिट्टेला दहशतवादी संघटना म्हणुन घोषित करणारा भारत पहिला देश ठरला. याचे अनुकरण करत ३२ देशांनी लिट्टेला दहशतवादी घोषित केले.

नॉर्वेची मध्यस्ती.....

अंतिम युद्ध....