श्रीलंका रेल्वे
श्रीलंकेच्या नकाशावर देशामधील रेल्वेमार्ग | |
प्रकार | सरकारी उद्योग |
---|---|
उद्योग क्षेत्र | रेल्वे वाहतूक |
स्थापना | इ.स. १८५८ |
मुख्यालय | कोलंबो, श्रीलंका |
सेवा | प्रवासी वाहतूक, माल वाहतूक, पार्सल सेवा |
महसूली उत्पन्न | ७४१.२ कोटी श्रीलंकन रुपये (२०१८ साली) |
एकूण उत्पन्न (कर/व्याज वजावटीपूर्वी) | -२२२.१ कोटी श्रीलंकन रुपये (२०१८ साली) |
मालक | श्रीलंका सरकार |
कर्मचारी | १४,८८५ |
पालक कंपनी | श्रीलंका रेल्वे मंत्रालय |
संकेतस्थळ | http://www.railway.gov.lk/ |
श्रीलंका रेल्वे ((सिंहला: ශ්රී ලංකා දුම්රිය සේවය; तामिळ: இலங்கை புகையிரத சேவை) ही श्रीलंका देशाची राष्ट्रीय रेल्वे कंपनी आहे. एकूण १,५०८ किमी लांबीचे लोहमार्गाचे जाळे असलेली श्रीलंका रेल्वे देशामध्ये प्रवासी व मालवाहतूक पुरवते. ब्रिटिश राजवटीदरम्यान १८५८ साली सिलोन रेल्वे ह्या नावाने स्थापन झालेली श्रीलंका रेल्वे प्रामुख्याने ब्रॉड गेजवर धावते व राजधानी कोलंबोला देशातील इतर प्रमुख शहरे व पर्यटन स्थळे ह्यांच्यासोबत जोडते. आजच्या घडीला सर्व रेल्वे वाहतूक डिझेल इंजिनांद्वारेच करण्यात येते.
प्रमुख मार्ग
- मुख्य मार्ग: कोलंबो-बाडुल्ला, कोलंबो-कॅन्डी
- उत्तर मार्ग: कोलंबो-कुरुनेगला-अनुराधापुरा-किलिनोच्ची-जाफना
- किनारपट्टी मार्ग: कोलंबो-गाली
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- अधिकृत संकेतस्थळ Archived 2014-04-14 at the Wayback Machine.