श्रीलंका प्रमाणवेळ
श्रीलंका प्रमाण-वेळ ही वेळ युनिव्हर्सल कोऑर्डिनेटेड टाइमपेक्षा भारताच्या वेळेप्रमाणेच ५ तास ३० मिनिटे पुढे आहे. संपूर्ण वर्षाकरिता हा फरक सध्यातरी कायम असतो. ही वेळ ८२.५° पूर्व या रेखांशाशी निगडित आहे. १५ एप्रिल २००६ पासून श्रीलंकेने ही भारतीय प्रमाणवेळ वापरण्यास सुरुवात केली.
इसवी सन १८८० पर्यंत हीच प्रमाणवेळ होती. परंतु जानेवारी १९४२ पासून ते सप्टेम्बर १९४२ पर्यंतच्या काळात घड्याळे अर्धा तास पुढे करून श्रीलंकेची प्रमाणवेळ ग्रीनविच मीन टाइमच्या सहा तास पुढे ठेवण्यात आली होती. त्यांतर, सप्टेंबर १९४२ मध्ये घड्याळे आणखी अर्ध्या तासाने पुढे केली गेली. इ.स. १९४५ मध्ये दुसरे महायुद्ध संपल्यावर श्रीलंकेने आपली प्रमाणवेळ पूर्ववत म्हणजे युनिव्हर्सल कोऑर्डिनेटेड टाइमपेक्षा ५ तास ३० मिनिटे पुढे ठेवायला सुरुवात केली. मात्र, विजेच्या तीव्र टंचाईवर उतारा म्हणून ऑक्टोबर १९९६ ते एप्रिल २००६ या काळात श्रीलंकेची प्रमाणवेळ UTC + 0600 hrs अशी करण्यात आली होती..