श्रीलंका क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९८२-८३
श्रीलंका क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९८२-८३ | |||||
न्यू झीलंड | श्रीलंका | ||||
तारीख | २ – २० मार्च १९८३ | ||||
संघनायक | जॉफ हॉवर्थ | सोमचंद्रा डि सिल्व्हा | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | न्यू झीलंड संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | न्यू झीलंड संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली |
श्रीलंका क्रिकेट संघाने मार्च १९८३ दरम्यान दोन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडच्या दौऱ्यावर गेला होता. श्रीलंकेचा हा पहिला न्यू झीलंड दौरा होता. कसोटी मालिका आणि एकदिवसीय मालिका न्यू झीलंडने अनुक्रमे २-० आणि ३-० अश्या जिंकल्या. न्यू झीलंड दौऱ्यानंतर ऑस्ट्रेलियात श्रीलंकेने दोन प्रथम-श्रेणी सामने देखील खेळले.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला सामना
२ मार्च १९८३ धावफलक |
न्यूझीलंड १८३/८ (५० षटके) | वि | श्रीलंका ११८/९ (५० षटके) |
- नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण.
- न्यू झीलंडमध्ये श्रीलंकेने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
- गाय डि आल्विस, सुसिल फर्नांडो, योहान गूणसेकरा आणि मित्रा वेट्टीमुनी (श्री) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
१९ मार्च १९८३ धावफलक |
श्रीलंका १६७/८ (५० षटके) | वि | न्यूझीलंड १६८/३ (३६.४ षटके) |
- नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
३रा सामना
२० मार्च १९८३ धावफलक |
न्यूझीलंड ३०४/५ (५० षटके) | वि | श्रीलंका १८८/६ (५० षटके) |
- नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.
- श्रीधरन जगनाथन (श्री) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
कसोटी मालिका
१ली कसोटी
४-८ मार्च १९८३ धावफलक |
न्यूझीलंड | वि | श्रीलंका |
- नाणेफेक: श्रीलंका, क्षेत्ररक्षण.
- न्यू झीलंडच्या भूमीवरचा हा श्रीलंकेचा पहिला कसोटी सामना.
- न्यू झीलंड आणि श्रीलंका या दोन देशांमधला हा पहिला वहिला कसोटी सामना.
- कसोटीत न्यू झीलंडने श्रीलंकेवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- जेफ क्रोव (न्यू), गाय डि आल्विस, सुसिल फर्नांडो, योहान गूणसेकरा, श्रीधरन जगनाथन, विनोदन जॉन, रवि रत्नायके आणि मित्रा वेट्टीमुनी (श्री) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
११-१५ मार्च १९८३ धावफलक |
श्रीलंका | वि | न्यूझीलंड |
- नाणेफेक: न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
- अमल सिल्वा (श्री) याने कसोटी पदार्पण केले.