Jump to content

श्रीराम अभ्यंकर

श्रीराम अभ्यंकर

पूर्ण नावश्रीराम शंकर अभ्यंकर
जन्मजुलै २२, इ.स. १९३०
मृत्यूनोव्हेंबर २, इ.स. २०१२
निवासस्थानइंडियाना, अमेरिका
राष्ट्रीयत्वभारतीय
कार्यक्षेत्रगणित (बीजगणितीय भूमिती)
कार्यसंस्थापरड्यू विद्यापीठ
कॉर्नेल विद्यापीठ
प्रशिक्षणमुंबई विद्यापीठ
हार्वर्ड विद्यापीठ
ख्यातीअभ्यंकर-मो सिद्धांत
अभ्यंकरांचा लेमा
अभ्यंकरांचे कंजेक्चर

डॉ. श्रीराम अभ्यंकर (जुलै २२, इ.स. १९३० - नोव्हेंबर २, इ.स. २०१२) हे अमेरिकेत राहणारे भारतीय-मराठी गणितज्ञ होते.

डॉ. श्रीराम अभ्यंकरांचा जन्म २२ जुलै १९३० रोजी भारतातील मध्य प्रदेशात उज्जैन येथे झाला. त्यांच्या वडलांचे नाव प्रा.शंकर केशव अभ्यंकर. ते गणिताचे प्राध्यापक होते. त्यांनी चार गणितज्ञांवर एक पुस्तक लिहिले आहे.

अभ्यंकरांचे शालेय आणि इंटर सायन्सपर्यंतचे शिक्षण ग्वाल्हेर येथे झाले. त्यांनी १९५१ साली मुंबईच्या 'इन्स्टीट्यूट ऑफ सायन्स' मधून बी.एस.सी.(गणित) ही पदवी मिळवली. मध्य प्रदेश सरकारच्या आर्थिक साहाय्याने त्यांनी अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला. त्यांनी एका वर्षातच १९५२ साली या विद्यापीठाची गणितातील ए.एम. ही सर्वोच्च पदवी मिळवली.[]

डॉ. श्रीराम अभ्यंकर हे प्रज्ञावंत गणिती होते. ते उत्तम शिक्षक, मराठी भाषाप्रेमी आणि पुण्यातील भास्कराचार्य प्रतिष्ठानचे संस्थापक होते. अभ्यंकर अमेरिकेतील परड्यू विद्यापीठात गणित, संगणक विज्ञान व औद्योगिक अभियांत्रिकीचे प्राध्यापक होते. त्यांचे बीजभूमिती या विषयात विशेष नैपुण्य होते.

शिक्षण

  • प्राध्यापक : अमेरिकेत कोलंबिया विद्यापीठात (इ.स. १९५५-इ.स. १९५६)
  • प्राध्यापक : अमेरिकेत कॉर्नेल विद्यापीठात (इ.स. १९५७-इ.स. १९५९)
  • प्राध्यापक : अमेरिकेत जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठात (इ.स. १९५९-इ.स. १९६३)
  • प्राध्यापक : अमेरिकेत पर्ड्यू विद्यापीठात (इ.स. १९६३-इ.स. १९६७)
  • आमंत्रित प्राध्यापक आणि संशोधन कार्यासाठी : अमेरिकेतील प्रिन्सटन, थेल, हॉर्वर्ड विद्यापीठे, जर्मनीमधील म्युन्सर व एरलॉगन विद्यापीठे, आणि कॅनडातील मॉन्ट्रिऑल विद्यापीठ
  • याशिवाय अनेक पाश्चात्त्य विद्यापीठात संशोधनासाठी आमंत्रण
  • भारतातील पुणे विद्यापीठात, मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेन्टल रिसर्चमध्ये आणि कलकत्त्यात इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटमध्ये संशोधनासाठी आमंत्रण
  • गणिताच्या १२ भारतीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे आजीव सदस्यत्व
  • गणिताच्या ४०हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांत प्रमुख वक्ता म्हणून आमंत्रण

संशोधनाचे विषय


  • बीजभूमिती (Algebraic Geometry)
  • क्रमनिरपेक्ष बीजगणित (Commutative Algebra)
  • स्थानीय बीजगणित (Local Algebra)
  • फलसिद्धान्त(पृथक संमिश्र चलफले)--Function Theory(Several Complex Variables)
  • परिपथ सिद्धान्त (Circuit Theory)
  • पुंज विद्युत्गतिशास्त्र (Quantum Electrodynamics)
  • वगैरे.

प्रकाशित साहित्य


  • बीजभूमितीतील सैद्धान्तिक पद्धतींचे शाखीभवन--Ramification of Theoretic Methods in Algebraic Geometry (Perdue University, 1959)
  • Local Analytic Geometry (Academic Press New York, 1964)
  • Resolutions of Singularities of Embedded Algebraic Surfaces(Academic Press New York, 1966)
  • A Glympse of Algebraic Geometry (Pune University, 1971)
  • Algebraic Space Curves (Montreal University Canada, 1971)
  • Geometric Theory of Space Curves( Abhyankar and Sathye)(Spinger Verlag New York, 1971)
  • Lectures on Expansion Technics in Algebraic Geometry (Tata Institute of Fundamental Research, Mumbai, India)
  • Weighted Expansions for Canonical Desingularization (Spinger Verlag New York, 1971)

चरित्र

कविता भालेराव यांनी श्रीराम अभ्यंकर यांचे ‘गणितयोगी डॉ. श्रीराम अभ्यंकर’ नावाचे मराठी चरित्र लिहिले आहे. हे पुस्तक राजहंस प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे.(मे २०१६)

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ घुले, माधव (२०१७). चित्पावन ब्राह्मण चरित्र कोश- खंड २. मुंबई: मौज प्रकाशन. pp. ५.
  2. ^ देशपांडे, अ.पां. (जून २०१८). "गणितयोगी डॉ.श्रीराम अभ्यंकर". राजहंस ग्रंथवेध. मे २०१६: ९ ते २१.