श्रीमान श्रीमती (मालिका)
श्रीमान श्रीमती (मालिका) | |
---|---|
दूरचित्रवाहिनी | दूरदर्शन |
भाषा | हिंदी |
प्रकार | दूरचित्रवाणी मालिका |
देश | भारत |
निर्माता | * गौतम अधिकारी
|
दिग्दर्शक | राजन वाघधरे |
निर्मिती संस्था | अधिकारी ब्रदर्स |
लेखक | अशोक पाटोळे |
शीर्षकगीत/संगीत माहिती | |
शीर्षकगीत | श्रीमान श्रीमतीजी (विनोद राठोड) |
प्रसारण माहिती | |
चित्रप्रकार | SDTV |
पहिला भाग | १९९४ |
अंतिम भाग | १९९७ |
एकूण भाग | ४७ |
वर्ष संख्या | ४ |
श्रीमान श्रीमती ही एक हिंदी भाषेतील सिटकॉम मालिका आहे, जी १९९४ ते १९९७ या काळात दूरदर्शनवर प्रसारित झाली. [१] या मालिकेत जतिन कनाकिया, राकेश बेदी, रीमा लागू आणि अर्चना पूरण सिंग यांच्या प्रमुख भूमिका होत्या . हा कार्यक्रम अशोक पाटोळे यांनी तयार केला होता, तर राजन वाघधरे यांनी याचे दिग्दर्शन केले होते. गौतम अधिकारी आणि मार्कंड अधिकारी (ज्यांना "अधिकारी बंधू" म्हणून ओळखले जाते) यांनी याची निर्मिती केली होती. [२]
हा कार्यक्रम तमिळमध्ये तिरुवल्लर तिरुमथी म्हणून भाषांतरित करण्यात आला. १९९९ मध्ये सिंहली भाषेमध्ये नोनवारुनी महाथवारुनी या नावाने याचा रिमेक करण्यात आला होता, जो सिरसा टीव्हीवर प्रसारित झाला होता. २०१५ मध्ये या मालिकेवर आधारित भाभी जी घर पर हैं! नावाच्या मालिकेचे &TV वर प्रसारण सुरू झाले. श्रीमान श्रीमती फिर से नावाच्या रीबूट मालिकेचा प्रीमियर १३ मार्च २०१८ रोजी सब टीव्हीवर झाला. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लावलेल्या राष्ट्रीय लॉकडाउन दरम्यान लोकप्रिय मागणीनुसार, दूरदर्शनने एप्रिल महिन्यात प्रसारित केली. डीडी नॅशनलवर ही मालिका दररोज संध्याकाळी ७.०० वाजता, तसेच डीडी भारतीवर रात्री ९:०० ते १०:०० पर्यंत दररोज २ भाग पुन्हा प्रसारित केले गेले. [३]
संदर्भ
- ^ Outlook. Hathway Investments Pvt Limited. October 1999. p. 354.
- ^ "Shriman Shrimati, Hudd Kar Di: Do You Remember These TV Shows?". Times of India. 29 November 2016. 14 May 2020 रोजी पाहिले.
- ^ Singh, Suhani (31 March 2020). "Doordarsh all set to re-telicast Shriman Shrimati on DD National". India Today. 31 March 2020 रोजी पाहिले.