Jump to content

श्रीनिवास ठाणेदार


श्रीनिवास ठाणेदार हे अमेरिकेत स्थिरावलेले एक मराठी उद्योगपती आहेत. ते मुळचे बेळगावचे राहणारे असून अमेरिकेत कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय करतात. जागतिक मंदीमुळे त्यांचा व्यवसाय एकदम शून्यावर आला, पण त्यावरही मात करून श्रीनिवास ठाणेदारांनी व्यवसायात पुनश्च उत्तुंग भरारी घेतली. उद्योगाला नव्याने सुरुवात केल्यानंतर त्यांनी 'पुन्हा भरारी' हे पुस्तक लिहिले. त्यांचे आधीचे पुस्तक 'ही'श्रीं'ची इच्छा'. हे पुस्तक आंतरजालावरही अाहे. त्या आंतरजालावरील पुस्तकाच्या पाच लाख प्रती उतरवून घेतल्या गेल्या.

श्रीनिवास ठाणेदार हे अमेरिकेतील डेमाॅक्रेटिक पक्षाचे सक्रिय सभासद आहेत. मिशिगन प्रांताच्या गव्हर्नरपदाच्या निवडणुकीला ते उभे होते. निवडणूक हरले असले तरी त्यांनी दॊन लाखांहून अधिक मते मिळवली होती. त्यांचे राजकारणातील अनुभवांवर आधारित एक पुस्तक प्रकाशनाधीन आहे.

नागपूरला ४ ते ६ जानेवारी २०१९ या काळात भरलेल्या जागतिक मराठी संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे. या संमेलनात त्यांच्या 'ही'श्रीं'ची इच्छा' या पुस्तकाची ५०वी आवृत्ती प्रकाशित झाली आहे.