Jump to content

श्रीनिवास कृष्ण पाटणकर

श्रीनिवास कृष्ण पाटणकरांचा जन्म ११ नोव्हेंबर १९१५ रोजी सोलापुरात झाला व १९ ऑक्टोबर १९३६ रोजी ते या जगातून निघूनही गेले. अवघे बावीस वर्षांचे आयुष्य लाभलेल्या या कवीला "प्राजक्ताची फुले' फारच आवडायची. त्यांच्या अनेक कवितांमधून या फुलाचा उल्लेख आढळतो.

'प्राजक्ताची फुले' हा त्यांच्या समग्र कवितांचा छोटेखानी संग्रह आहे. 'चंद्रकला' हे वृत्त त्यांच्या विशेष आवडीचे असावे, असे त्यांच्या एकंदर कवितांवरून दिसून येते. अनेक कविता याच वृत्तात आहेत.