श्रीकांत नारायण
श्रीकांत नारायण (जन्म : १७ जानेवारी, इ.स. १९६८) हे एक मराठी गायक आणि रंगमंच कलाकार आहेत. त्यांची मराठी, हिंदी, तामिळ. तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत गायलेली एक हजाराहून अधिक नेक गाणी ध्वनिमुद्रित झाली आहेत.
मुंबईतल्या अंधेरीमधील भवन्स कॉलेजमध्ये शिकत असताना श्रीकांत नारायण यांनी १९८५-८६ साली एका संगीत स्पर्धॆत विजय मिळाला आणि त्यांची संगीतातली कारकीर्द सुरू झाली. १९९० साली पदवी मिळाल्यानंतर ते मे ॲन्ड बेकर या औ़षध निर्मिती कंपनीत नोकरी करू लागले. १९९७ साली त्यांनी ती नोकरी सोडली आणि त्यांनी संगीतासाठी पूर्ण वेळ देऊन संगीतातच कारकीर्द करायचे ठरवले.
श्रीकांत नारायण यांनी कविता कृष्णमूर्ती, विनोद राठोड, शंकर महादेवन आणि सुदेश भोसले यांच्यासारख्या गायकांबरोबर अनेक रंगमंचीय कार्यक्रम केले. 'रफी की रुहानियात' हाही त्यांचाच एक कार्यक्रम आहे. श्रीकांत नारायण यांचा घनगंभीर दर्जेदार आवाजामुळे ते 'रफीचा आवाज' म्हणून ओळखले जातात. त्यांच्या जाहीर कार्यक्रमांची संख्या ८००हून अधिक झली आहे.
मोहम्मद रफी नाइट्स
श्रीकांत नारायण हे १९९७ सालापासून दर वर्षी ३१ जुलै या रफीच्या स्मृतिदिनी काही गायकांच्या साथीने 'फिर रफी' हा कार्यक्रम सादर करतात. २५ डिसेंबर २०१२ रोजी मोहम्मद रफीच्या ८८व्या जयंतीच्या निमित्ताने त्यांनी मुंबईत 'पुकारता चला हूँ मैं' हा कार्यक्रम केला. सतत १२ तास चाललेल्या या कार्यक्रमात श्रीकांत नारायण हे रफीची १०१ गाणी गायले. त्या कार्यक्रमाला रफीचे पूर्ण कुटुंब उपस्थित होते.
श्रीकांत नारायण यांची प्रसिद्ध/अप्रसिद्ध गाणी
- आई माझी नवसाला पावली
- आम्ही करतो साई सेवा
- एक बांगडी सौभाग्याची
- एकवीरा आयली दर्याकिनारी
- ओम जय गजानन
- कैसा गाठू मी सागर किनारा
- कोल्याचा पोर अन् बाल्याची पोर
- कोळ्याची नौका
- खडोबाचा गोंधळ (शब्द?)
- गॅट मॅट इंग्लिशवाली (सहगायक - वैशाली सामंत, शकुंतला जाधव, संतोष नायक, वगैरे)
- गाऊ या महिमा नाथांचा
- गोरां गोरा हाय मामाची पोर
- गोरी गोरी रूपाने चिकणी
- घट भरला आई रेणुकेचा
- चमत्कार थोर तुझा (सहगायक - [[राहुल शिंदे, विठ्ठल शिंदे, शकुंतला जाधव)
- चल भोलेनाथ के द्वारे (हिंदी)
- चला रे जाऊ या शिर्डीला
- चला दाजिबा गिरिजादेविला (सहगायिका - शकुंतला जाधव)
- चला दाजिबा घरस्तेवरला
- चला दाजिबा शिखर शिंगणापुरला
- जागराला आली माझी तुळजाभवानी
- जीवदानी महामाया
- डोंगराची माउली
- दाजिबा आले कोलीबायां
- दिंडी निघाली पंढरिला
- दे गो काळी चिंबोरी
- नाच गंगू नाच
- पंढरपुरी सखुबाई फुगडी खेळे (सहगायक - नेहा राजपाल, राहुल शिंदे)
- पारू गं पारू
- भीम ठासून बोलले
- मला कवड्याची माळ पाहिजे
- महिमा चारी धर्माचा
- महिमा बरा ज्योतिर्लिंगाचा
- महिमा शनिदेवाचा
- माहूर की रेणुका मैया
- मोबाइलवाला नवरा पायजे
- लग्नाची धमाल
- लिख दे नाम मुरारी का (हिंदी)
- वेसाव्याची पारू
- शनिेदेवाची पालखी निघाली
- शनीचा जगी बोलबाला
- हातान् हात धरला
- हीरो आले लग्नाला
- हे देवा ज्योतिबा
- हे भिमाशंकरा
- ह्यो बघ कोलीवाडा
(अपूर्ण)
सन्मान, पुरस्कार आणि यशप्राप्ती
- श्रीकांत नारयण यांनी गायलेल्या 'डोल डोलतंय वाऱ्यावरी' या गाण्याला दुहेरी प्लेटिनम तबकडीचा दर्जा मिळाला आहे.
- महाराष्ट्र सरकारकडून कलाभूषण पुरस्कार
- मध्य प्रदेश सरकारकडून जन परिषद पुरस्कार