श्रीकांत देशमुख
श्रीकांत देशमुख | |
---|---|
जन्म नाव | श्रीकांत साहेबराव देशमुख |
जन्म | जुलै ३, इ.स. १९६३ राहेरी (बु.) ता. सिंदखेडराजा, बुलढाणा जिल्हा, महाराष्ट्र, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | सनदी अधिकारी |
साहित्य प्रकार | कविता, कादंबरी, |
विषय | सामाजिक, ग्रामीण |
प्रसिद्ध साहित्यकृती | बळिवंत बोलावे ते आम्ही पिढीजात |
पत्नी | शालिनी |
अपत्ये | सुशांत, मुक्ता |
पुरस्कार |
|
श्रीकांत साहेबराव देशमुख हे मराठीतील साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक आहेत. त्यांचा जन्म ३ जुलै, १९६३ मध्ये मौजे राहेरी (बु.) ता. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा येथे झाला. मुळचे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील राहेरी बुद्रुकचे असून सद्या ते नांदेडला स्थायिक झाले आहेत. ते सनदी अधिकारी आहेत.
शैक्षणिक माहिती
- नुतन माध्यमिक विद्यालय, किनगाव राजा (१०वी पर्यंत)
- शिवाजी महाविद्यालय, चिखली (१२वी पर्यंत)
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद (एम.ए., राज्यशास्त्र)
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद (एम.फिल.- 'महाराष्ट्राची शेतकरी चळवळ')
प्रकाशित साहित्य
कविता संग्रह
- बळिवंत (१९९७)
- आषाढमाती (२००३)
- बोलावे ते आम्ही (२०१३)
कादंबरी
- पिढीजात
नाटक
- नली (नाट्यरूपांतर, शंभु पाटील)
ललितगद्य
- पडझड वाऱ्याच्या भिंती (२०१५)
- साखर कारखानदारीतले दादा (२०१६)
वैचारिक
- महाराष्ट्रातील शेतकरी चळवळ : प्रस्तावना डॉ. भा.ल. भोळे (१९९७)
- कुळवाडी भूषण शिवराय : प्रस्तावना डॉ. सदानंद मोरे (२०१३)
संपादन
- महानोरांची कविता (समीक्षा संपादन) (२००३)
- समकालीन साहित्यचर्चा : डॉ. नागनाथ कोतापल्ले गौरवग्रंथ (२०१०)
- भालचंद्र नेमाडे यांचे साहित्य : नव्या पिढीचे अर्धशतकोत्तर पुरावलोकन (२०१५)
पुरस्कार
- 'बोलावें ते आम्ही' या काव्यसंग्रहाला २०१७ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार[१] [२]
- महाराष्ट्र फाऊंडेशन, अमेरिका (२००४)
- महाराष्ट्र राज्य शासन, केशवसुत पुरस्कार (२०१४)
- लोकमंगल पुरस्कार, सोलापूर (२०१३)
- मराठवाडा साहित्य परिषद, म.भि. चिटणीस पुरस्कार (१९९८)
- विशाखा साहित्य पुरस्कार, नाशिक (१९९८)
- पद्मश्री विखे पाटील सन्मान, प्रवरानगर (१९९८)
- बी. रघुनाथ पुरस्कार, औरंगाबाद (१९९८)
- यशवंतराव चव्हाण सन्मान, पुणे (१९९८)
- कै .भि.ग. रोहमाने पुरस्कार, कोपरगाव (१९९८)
- दुःखी, राय हरिशचंद्र साहनी पुरस्कार, जालना (२००४)
- मराठवाडा साहित्य परिषद, कुसूमावती देशमुख पुरस्कार, औरंगाबाद (२००४)
- ना.घ. देशपांडे पुरस्कार, बुलढाणा (२००४)
- शिवार प्रतिष्ठान, शेतकरी साहित्य पुरस्कार, औरंगाबाद (२०१४)
- दाते प्रतिष्ठान, वर्धा (२०१४)
- चैत्रसंवाद, नाशिक (२०१४)
- नारायण सुर्वे पुरस्कार, अमरावती (२०१४)
- शब्दवेल प्रतिष्ठान, लातूर (२०१४)
- प्रसाद बन पुरस्कार, नांदेड (२०१४)
- मुद्रा पुरस्कार, जालना (२०१४)
संदर्भ
- ^ "श्रीकांत देशमुख, सुजाता देशमुख यांना साहित्य अकादमी पुरस्कार". 25 February 2021 रोजी पाहिले.
- ^ "...म्हणून मला उजळ माथ्यानं कुणबीपण मिरवताना विशेष आवडतं". 25 February 2021 रोजी पाहिले.