श्रावणी सोमवार
श्रावणी सोमवार हा श्रावण महिन्यातील सोमवारचा दिवस आहे.श्रावण महिन्यातील सोमवार याचे भगवान शिवाच्या पूजेसाठी विशेष महत्व मानले जाते.[१]
स्वरूप
सोमवारी शिव मंदिरात जाऊन भगवान शिवांचे दर्शन घेणे, व्रताचा भाग म्हणून उपवास करणे, पांढरा पोशाख प्रिधना करणे, दान देणे अशा स्वरूपाचे आचार या दिवशी केले जातात. बारा ज्योतिर्लिंग म्हणून मान्यता पावलेल्या मंदिरांमध्ये जाऊन भाविक दर्शन घेतात. ज्यांना हे शक्य नसते ते स्थानिक शिव मंदिरात जाऊन दीप अर्पण करणे, बेलाची पाने वाहणे, शिवामूठ अर्पण करणे असे उपचार करतात.[२]
कहाणी
सतीने तिचे पिता दक्षच्या घरी योगशक्तीने शरीराचा त्याग केला होता. त्याआधी देवी सतीने शंकराला प्रत्येक जन्मात पती स्वरूपात मिळवण्याचा प्रण केला होता. देवी सतीने त्यांच्या दुसऱ्या जन्मात पार्वती असे नाव घेऊन राजा हिमाचल आणि राणी मैना यांच्या घरात मुलीच्या रूपात जन्म घेतला. पार्वतीने श्रावण महिन्यात निराहार राहून कठोर व्रत करून महादेवाला प्रसन्न केले व विवाह केला. त्यानंतर महादेवाला श्रावण महिना विशेष झाला. यामुळेच श्रावण महिन्यात कुमारिका सुयोग्य वर प्राप्तीसाठी व्रत करतात.
संदर्भ
- ^ "Shravan Somwar 2024 Puja Samagri List : श्रावणातल्या पहिल्या सोमवारी शिवपुराणानुसार करा शिवलिंगाची पूजा, जाणून घ्या पूजाविधी आणि साहित्य". Maharashtra Times. 2024-08-02 रोजी पाहिले.
- ^ "आज है सावन का दूसरा सोमवार, यह योग है पूजा का अति उत्तम, इस समय करें शिव भगवान का रुद्राभिषेक". ndtv.in (हिंदी भाषेत). 2024-08-02 रोजी पाहिले.