श्याम नंदन प्रसाद मिश्रा
श्याम नंदन प्रसाद मिश्रा (२० ऑक्टोबर इ.स. १९२० – २५ ऑक्टोबर इ.स. २००४) हे एक भारतीय राजकारणी होते. २८ जुलै १९७९ – १३ जानेवारी इ.स. १९८० दरम्यान ते भारताचे परराष्ट्रमंत्री होते. त्यांचा जन्म इ.स. १९२० मध्ये गोनावान, पटना येथे झाला. त्यांचे शिक्षण शिरसंद, मुजफ्फरपूर आणि लॉ कॉलेज, पटना येथे झाले.