Jump to content

श्यामलाल यादव

श्यामलाल यादव (१ मे १९२८ - ६ मे २००५) एक भारतीय राजकारणी होते. ते राज्यसभेचे उपसभापती आणि ८व्या लोकसभेचे संसद सदस्य होते. यादव यांनी उत्तर प्रदेशच्या वाराणसी मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले आणि ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या राजकीय पक्षाचे सदस्य होते.[]

राजकारण

भारतीय स्वातंत्र्यानंतर श्यामलाल यादव यांनी राजकारणात प्रवेश केला. आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी उत्तर प्रदेश विधानसभा, लोकसभा आणि राज्यसभेत काम केले.

भूषवलेली पदे

# पासून पर्यंत स्थिती
01 1957 1962 सदस्य, उत्तर प्रदेश विधानसभा
02 1967 1968 सदस्य, उत्तर प्रदेश विधानसभा
03 1967 1968 कायदे मंत्री, उत्तर प्रदेश विधानसभा
04 1967 1968 संसदीय कार्यमंत्री, उत्तर प्रदेश विधानसभा
05 1967 1968 अन्न व नागरी पुरवठा मंत्री, उत्तर प्रदेश विधानसभा
06 1967 1968 उद्योग मंत्री, उत्तर प्रदेश विधानसभा
08 1970 1984 सदस्य, राज्यसभा
09 1980 1984 राज्यसभा उपाध्यक्ष
10 1984 1989 सदस्य, ८वी लोकसभेची
12 1988 1989 केंद्रीय कृषी व सहकार राज्यमंत्री

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "Former Deputy Chairmen Of The Rajya Sabha". Rajya Sabha website. Dec 2013 रोजी पाहिले. |access-date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)