Jump to content

श्यामची शाळा

श्यामची शाळा
दिग्दर्शन प्रकाश जाधव
निर्मिती प्रकाश जाधव
प्रमुख कलाकारअरुण नलावडे,
विजय पाटकर,
मिलिंद शिंदे,
विजय कदम,
निशा परुळेकर
गीतेएकनाथ पवार, अक्षय शिंदे
संगीत श्रीरंग आरस
देश भारत
भाषामराठी
प्रदर्शित २०१७


श्यामची शाळा हा एक मराठी चित्रपट आहे. याची निर्मिती साईनाथ चित्र या संस्थेने केली. निमिर्ती व दिग्दर्शन प्रकाश जाधव यांचे असून हा चित्रपट सामाजिक आशयावर आहे. महाराष्ट्र शासनाने याला करमुक्त केले आहे.

अरुण नलावडे, विजय पाटकर, मिलिंद शिंदे, विजय कदम आणि अभिनेत्री निशा परुळेकर आदींनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाला श्रीरंग आरस यांचे संगीत दिले आहे. विदर्भातील गीतकार एकनाथ पवार यांचे या चित्रपटात दोन गाणी असून पार्श्वगायीका संजीवनी भिलांडे हिने गायीले आहे. अक्षय शिंदे यांनी लिहिलेले गीत पार्श्वगायक श्रीपाद मल्या यांनी गायीले आहे. फिल्म फेस्टिवल मध्ये या चित्रपटाने विविध पुरस्कार देखील पटकावले होते.

चित्रपट निर्माते प्रकाश जाधव यांनी सन २०१७ मध्ये श्यामची शाळा या सामाजिक संदेश देणाऱ्या चित्रपटाची निर्मिती केली. यापूर्वी 'आम्ही चमकते तारे', रमाबाई भीमराव आंबेडकर या चित्रपटाची निर्मिती केली. त्यात मकरंद अनासपुरे, भरत जाधव, निर्मिती सावंत , निशा परूळेकर या ज्येष्ठ कलावंतांनी भूमिका साकारल्या होत्या. सन २०२१ मध्ये 'वेल डन बाॅईज' या चित्रपटाची निर्मिती केली आहे, त्यात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी व विजय पाटकर यांनी भूमिका साकारल्या आहेत.