शोषखड्डा
शोषखड्डा हा सांडपाण्याची विल्हेवाट करण्यासाठी केलेला खड्डा होय. राहते. परसबाग व शोषखड्डा हे प्रत्येक कुटुंबात करता येते.घराभोवती, रस्त्यात आणि गटारीत तुंबलेले सांडपाणी आरोग्यास घातक असते. तसेच त्याचा घाण वास येतो, रस्त्यावर त्या पाण्याने चिकचिक होऊन घसरडे होते आणि डासांना अंडी घालायला जागा मिळते. हे डास चावल्याने लोकांना मलेरियासारखे रोग होतात. अशा सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी जमिनीत सांडपाणी जिरण्यासाठी परसबाग किंवा शोषखड्डा करता येतो.
घरातील सांडपाण्याची योग्य पद्धतीने केलेली विल्हेवाट म्हणजे शोषखड्डा होय. सांडपाणी मुद्दाम तयार केलेल्या शोषखड्डयात सोडावे, तेथून ते जमिनीत मुरते. आंघोळीच्या मोरीतील, धुण्याभांडीच्या पाण्याचीही विल्हेवाट शोषखड्ड्याद्वारे होऊ शकते. वाळु असलेल्या, मुरमाड जमिनीत ह्या पाण्याचा चांगला निचरा होतो. पण चिकणमाती असलेल्या जमिनीत मात्र याचा फारसा उपयोग होत नाही. अशावेळी चर खणून पाण्याला दूर न्यावे लागते. त्यामुळे रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्यास आळा बसेल व त्यापासून रोगराई टाळण्यास मदत होते. त्यामुळे शोषखड्डे तयार करणे उपयोगाचे ठरते.
शोषखड्डा कसा तयार करावा ?
शोषखड्डा हा वेगवेगळ्या लहान मोठ्या दगडांचा वापर तयार केला जातो .त्यामुळे शोषखड्ड्याच्या कडा ढासळत नाहीत आणि सांडपाणी त्यात पडले की ते हळूहळू जमिनीत मुरते.
नियोजन
सांडपाणी सुरुवातीला ज्या भागात येते, तिथे केळी, शेवगा, कढीपत्ता अळूसारख्या भाज्या लावाव्यात. कारण यांना जास्त पाण्याची आवश्यकता असते. नंतर झाडवर्गीय भाजी लावावी. उदा. वांगी, गवार, भेंडी, मिरची इ. व त्यानंतर भाजीवर्गीय उदा. मेथी, चुका, पालक, कोथिंबीर इ. व मूळवर्गीय उदा. कांदा, मुळा, रताळी लावावीत. वेलवर्गीय भाजी कारले, दोडका, वाल इ. कुंपणावर, छतावर किंवा मांडवावर सोडाव्यात.
फायदे
- शोषखड्ड्याजवळ झाडे लावल्याने निसर्गाचा समतोल राखला जातो.
- सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लागते व त्यामुळे डासांचे प्रमाण कमी होते व त्रासही कमी होतो.
- मलेरियासारखे डासांपासून पसरणारे आजार होत नाहीत व आरोग्य सुदृढ राहते.
संदर्भ[१]
- ^ "Dry well". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2020-02-17.