शोभिता धुलिपाला
Indian model, actress | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | मे ३१, इ.स. १९९२ तेनाली | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
व्यवसाय | |||
| |||
शोभिता धुलिपाला (जन्म ३१ मे १९९२) ही एक भारतीय अभिनेत्री आहे. तिने फेमिना मिस इंडिया २०१३ स्पर्धेत फेमिना मिस इंडिया अर्थ २०१३ खिताब जिंकला आणि मिस अर्थ २०१३ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. [१] धुलिपालाने अनुराग कश्यपच्या रमण राघव २.० (२०१६) हिंदी चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली आणि त्यानंतर मेड इन हेवन (२०१९-२३) या ॲमेझॉन प्राइम व्हिडिओच्या नाट्य मालिकेत मुख्य भूमिका साकारली.[२]
धुलिपाला ही तेलुगू चित्रपट गुडाचारी (२०१८) आणि मेजर (२०२२), मल्याळम चित्रपट मूथॉन (२०१९) आणि कुरूप (२०२१), दोन भागांचे तमिळ चित्रपट पोन्नियिन सेल्वन: १ (२०२२ ) आणि पोन्नियिन सेल्वन: २ (२०२३) व क्राईम थ्रिलर मालिका द नाईट मॅनेजर (२०२३) मध्ये दिसली.[३] ॲक्शन थ्रिलर मंकी मॅन (२०२४) सह तिने अमेरिकन सिनेमामध्ये काम केले.
संदर्भ
- ^ "Miss India Diaries: I planted 30 saplings on World Environment Day, says Sobhita!". Femina Miss India. 6 June 2013. 24 April 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 11 January 2021 रोजी पाहिले.
- ^ "'Made in Heaven' trailer: Big fat weddings and secrets in Amazon Prime Original series". Scroll.in. 14 February 2019. 31 July 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 11 January 2021 रोजी पाहिले.
- ^ Jamindar, Shriya (15 August 2023). "What the jewellery worn by the characters in Made in Heaven season 2 have to say about their glamorous lives". Vogue India. 22 August 2023 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 9 March 2024 रोजी पाहिले.