शोभा डे
शोभा डे | |
---|---|
Shobhaa De, at 'Meet The Author' programm conducted by sharjha International Book Fair 2011 | |
जन्म | शोभा राजाध्यक्ष ७ जानेवारी १९४८ सातारा, बॉम्बे, ब्रिटिश भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
शिक्षण | सेंट झेवियर्स कॉलेज, मुंबई |
पेशा |
|
जोडीदार |
शोभा राजाध्यक्ष- डे (पूर्वी किलाचंद, ७ जानेवारी, इ.स. १९४८ - ) या एक भारतीय कादंबरीकार आणि स्तंभलेखक आहेत. त्या काल्पनिक साहित्यामधील सोशलाइट्स आणि लैंगिक चित्रणासाठी प्रसिद्ध आहेत.[१]
जीवन
शोभा डे यांचा जन्म महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात राजाध्यक्ष कुटुंबात झाला.[२] त्यांनी आपल्या कारकीर्दची सुरुवात झीनत अमान यांच्यासोबात मॉडेलिंगच्या क्षेत्रात केली. या भारतीय लेखक आणि स्तंभलेखक आहेत. पेज थ्री कल्चर अशी ओळख असलेल्या संपन्न भारतीयांच्या सांस्कृतिक- सामाजिक जीवनाशीच त्या आयुष्यभर प्रामुख्याने निगडित राहिल्याने त्यांच्या लेखनातूनही याच जीवनाचे चित्रण आढळते.[३][४]
खाजगी आयुष्य
मूळ नाव शोभा राजाध्यक्ष असलेल्या डे यांनी मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयातून त्यांनी मानसशास्त्रात पदवी घेतली. तरुण वयात मॉडेल म्हणून मोठे नाव कमावल्यानंतर त्यांनी १९७० मध्ये पत्रकारिता सुरू केली. पती दिलीप डे आणि सहा मुलांसह त्या कफ परेड, मुंबई येथे राहतात.
शोभाने दोनदा लग्न केले आहे आणि तिने अनेकदा सांगितले आहे की ती सहा मुलांची आई आहे, ज्यात दोन सावत्र मुलांचा समावेश आहे.[५] पदवीनंतर शोभाने किलाचंद मारवाडी व्यापारी कुटुंबातील सुधीर व्रजलाल किलाचंद यांच्याशी विवाह केला. ते लवकरच दोन मुलांचे पालक झाले, एक मुलगा, आदित्य किलाचंद आणि एक मुलगी, अवंतिका. विवाह घटस्फोटात संपला. शोभाने मग दिलीप डे, शिपिंग उद्योगातील व्यापारी आणि बंगाली यांच्याशी लग्न केले. दिलीप यांचेही हे दुसरे लग्न होते आणि त्यांना आधीच्या लग्नातून दोन मुले आहेत. शोभा आणि दिलीप डे हे आणखी दोन मुलींचे पालक झाले, अरुंधती आणि आनंदिता.[६][७]
लेखन
स्टारडस्ट, सोसायटी आणि सेलेब्रिटी या संपन्न वाचकांवर्गाच्या मासिकांचे संपादन त्यांनी केले. उद्योग मनोरंजन आणि संपन्न भारतीयांच्या जीवनावर त्यांनी प्रामुख्याने लिहीले. १९८० पासून त्या विविध भारतीय नियतकालिकांतून सातत्याने स्तंभलेखनही करीत आहेत. थेट, मामिर्क आणि पारदर्शी लेखन हे त्यांच्या स्तंभांचे वैशिष्ट्य मानले जाते. अनेक पुस्तके त्यांनी लिहीली आहेत. त्यात स्टारी नाईटस, सिस्टर्स, सिलेक्टिव्ह मेमरीज, सर्व्हायविंग मेन, स्पीडपोस्ट, स्पाउस - द ट्रूथ अबाऊट मॅरेज आणि सुपरस्टार इंडिया- फ्रॉम इनक्रेडिबल टू अनस्टॉपेबल या पुस्तकांचा समावेश आहे.
- ^ January 10, Shougat Dasgupta; January 22, 2018 ISSUE DATE:; January 12, 2018UPDATED:; Ist, 2018 17:52. "That Shobhaa De show: Godmother of Indian chatterati embraces her 70s with new book". India Today (इंग्रजी भाषेत). 2022-03-06 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
- ^ Nandgaonkar, Satish; Rashid, Omar (2015-04-14). "My DNA is 100% Maharashtrian, says Shobhaa De" (इंग्रजी भाषेत). Mumbai. ISSN 0971-751X.
- ^ Facebook; Twitter; options, Show more sharing; Facebook; Twitter; LinkedIn; Email; URLCopied!, Copy Link; Print (1992-04-01). "'The Jackie Collins of India'". Los Angeles Times (इंग्रजी भाषेत). 2022-03-06 रोजी पाहिले.
- ^ January 10, Shougat Dasgupta; January 22, 2018 ISSUE DATE:; January 12, 2018UPDATED:; Ist, 2018 17:52. "That Shobhaa De show: Godmother of Indian chatterati embraces her 70s with new book". India Today (इंग्रजी भाषेत). 2022-03-06 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
- ^ Facebook; Twitter; options, Show more sharing; Facebook; Twitter; LinkedIn; Email; URLCopied!, Copy Link; Print (1992-04-01). "'The Jackie Collins of India'". Los Angeles Times (इंग्रजी भाषेत). 2022-03-06 रोजी पाहिले.
- ^ February 28, DILIP BOBB; February 28, 2005 ISSUE DATE:; March 22, 2005UPDATED:; Ist, 2012 11:05. "Shobhaa De's 'Spouse' takes a hard look at Indian marriages". India Today (इंग्रजी भाषेत). 2022-03-06 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
- ^ "'Marriage is becoming like the dinosaur'". www.rediff.com. 2022-03-06 रोजी पाहिले.