शोभा अभ्यंकर
शोभा अभ्यंकर | |
---|---|
संगीत प्रकार | खयाल, भजने, भावगीते |
वाद्ये | गाणे |
कार्यकाळ | १९७० – २०१४ |
डॉ. शोभा अभ्यंकर (1946-2014) या भारतीय संगीतशास्त्रज्ञ आणि मेवाती घराण्याच्या शिक्षिका होत्या. त्यांनी अनेक हिंदुस्थानी शास्त्रीय गायकांना शास्त्रीय संगीत शिकवले. त्यांचा मुलगा संजीव अभ्यंकर[१] हा देखील हिंदुस्थानी शास्त्रीय गायक आहे.
वैयक्तिक जीवन
डॉ. शोभा अभ्यंकर यांचा जन्म १९४६ साली पुणे, भारत येथे झाला. त्यांनी विजय अभ्यंकर यांच्याशी लग्न केले आणि त्यांना दोन मुले झाली.[२]
शिक्षण
त्यांनी पुणे विद्यापीठातून बायोकेमिस्ट्रीमध्ये एम.एस्सी. केले. त्यांनी एसएनडीटी महिला विद्यापीठातून संगीत विषयात एमए पूर्ण केले. तिथे त्यांनी प्रथम स्थान मिळविले. त्यांनी मराठी भावगीत या विषयावर संगीतात पीएच.डीही पूर्ण केली.[३][४]
संगीत प्रशिक्षण
त्यांनी पंडीत गंगाधरबुवा पिंपळखरे, पंडीत व्ही.आर.आठवले आणि पंडीत जसराज यांच्याकडे अनेक दशके संगीताचे प्रशिक्षण घेतले.[५] परिणामी, त्यांना ग्वाल्हेर गायकी आणि आग्रा गायकीची पार्श्वभूमी असलेल्या मेवाती घराण्याच्या सदस्या म्हणून ओळखले जाते.[६]
कारकीर्द
डॉ. शोभा अभ्यंकर हे ललित कला केंद्र, पुणे विद्यापीठ आणि एसएनडीटी महिला विद्यापीठाशी संगीत अभ्यासक आणि गुरू म्हणून संलग्न होते.[७]
शिकवण
डॉ. शोभा अभ्यंकर यांनी संपूर्ण महाराष्ट्रात अनेक विद्यार्थ्यांना शिकवले आहे.[८] ज्यांनी आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पुरस्कार आणि शिष्यवृत्ती मिळवली आहे.[९] त्यांच्या सर्वात उल्लेखनीय शिष्यांमध्ये संजीव अभ्यंकर (त्यांचा मुलगा)[१०] आणि संदीप रानडे यांचा समावेश आहे.[११]
मृत्यू
डॉ. शोभा अभ्यंकर यांचे १७ ऑक्टोबर २०१४ रोजी कर्करोगाने निधन झाले.[२]
पुरस्कार आणि ओळख
- "गानहीरा" पुरस्कार
- वसंत देसाई पुरस्कार
- पं. एन डी कशाळकर पुरस्कार
- पं. व्ही.डी.पलुस्कर पुरस्कार
- गुरू म्हणून उत्कृष्ट कार्यासाठी "राग ऋषी" पुरस्कार
संदर्भ
- ^ "Pt. Sanjeev Abhyankar". Sanjeevabhyankar.com. 23 January 2019 रोजी पाहिले.
- ^ a b "Dr. Shobha Abhyankar passed away". Loksatta.com. 17 October 2014. 23 January 2019 रोजी पाहिले.
- ^ "Suyash Book gallery". Suyashbookgallery.com. 2019-01-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 23 January 2019 रोजी पाहिले.
- ^ "सखी भावगीत माझे...-Sakhi Bhavagit Maze... by Dr. Shobha Abhyankar - Rajhans Prakashan". Bookganga.com. 23 January 2019 रोजी पाहिले.
- ^ Phatak, Vaishali. "लिहावंसं वाटलं: माझ्या गुरु". Vaishalisphatak.blogspot.com. 23 January 2019 रोजी पाहिले.
- ^ Budhiraja, Sunita (July 18, 2018). Rasraj : Pandit Jasraj. Vani Prakashan. p. 338.
- ^ "Artist - Shobha Abhyankar (Vocal), Gharana - Mewati". Swarganga.org. 23 January 2019 रोजी पाहिले.
- ^ "Local singer Dr Shobha Abhyankar and her disciples will be presenting 15 different variations of Raag Todi in a performance tomorrow. Dr Abhyankar will be explaining the finer nuances of the raag along with performances by her senior disciples. - Times of India". The Times of India.
- ^ "डॉ. शोभा अभ्यंकर यांना 'रागऋषी' पुरस्कार प्रदान". Maharashtra Times. 9 March 2008. 23 January 2019 रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ "IPAAC Home". Ipaac.org. 2019-01-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 23 January 2019 रोजी पाहिले.
- ^ "Classical Music Guru Shobha Abhyankar passed away". Lokmat.com. 17 October 2014. 23 January 2019 रोजी पाहिले.