शैलजा रानडे
प्रा. डाॅ. शैलजा मधुकर रानडे(२४ जानेवारी १९५१ - १३ जानेवारी, २०२२) या एक मराठी लेखिका होत्या. त्यांचे यवतमाळला वास्तव्य होते.तेथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयात त्या संस्कृतच्या अधिव्याख्यात्या होत्या. त्यांची काही पुस्तके संस्कृत साहित्यावर व व्याकरणावर आहेत.
शैक्षणिक कारकीर्द
एम.ए. (संस्कृत, राज्यशास्त्र), पीएच.डी. बी.एड. शैलजा रानडे या एम.ए. संस्कृतच्या परीक्षेत अमरावती विद्यापीठतून पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या होत्या त्या यवतमाळ शहरातील संस्कृतच्या पहिल्या पीएच.डी आहेत.
शैलजा रानडे यांनी लिहिलेली पुस्तके
- अभिज्ञान शाकुंतलम् पंचम अंक - एक रसग्रहण
- उपनिषदे सांगती कथा (बालसाहित्य)
- कथा दानवीरांच्या (बालसाहित्य)
- कालिदास कथा
- प्रार्थना
- भगवान परशुराम
- मधुसञ्चयः
- महाराष्ट्रातील प्रासंगिक कथा
- महाकवी भास विरचितम् स्वप्नवासवदत्तम् (भाषांतर व टीपांसह)
- रुद्राध्यायाचे अंतरंग
- संस्कृत निबंध ज्योत्स्ना
- संस्कृत व्याकरण-सुरभि
- संस्कृत साहित्यातील तीन नायिका
- सुभाषित रसस्वाद
- स्वर-माला (पुष्पमाला व स्वरसंधी-संस्कृत व्याकरणाचा भाग)
- ॐ हर्षचरितसारः (बाणभट्ट विरचित हर्षचरितसार)
संदर्भ
- विदुषी डॉ. शैलजा रानडे यांचे निधन Archived 2022-01-13 at the Wayback Machine.