Jump to content

शेवगा

शेवग्याच्या शेंगा

शेवगा (शास्त्रीय नाव: Moringa oleifera, मॉरिंगा ऑलिफेरा ; इंग्लिश: Drumstick, ड्रमस्टिक ;) ही मॉरिंगेशिए कुळातल्या मॉरिंगा प्रजातीतील सर्वाधिक आढळणाऱ्या जातीची वनस्पती असून उष्ण कटिबंधीय व समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशांत आढळणारा हा वृक्ष १० मी. उंचीपर्यंत वाढतो. याच्या फुले, पाने तसेच शेंगांचा पाककृती बनवण्यासाठी वापर होतो.याला विदर्भातील झाडीप्रांतात मुंगना असं म्हणतात.

वनस्पतीची रचना

शेवग्याच्या झाडाला आलेला फुलोरा व पाने

उपयोग

वाळलेल्या शेवग्याच्या बियांचे चूर्ण पाणी निर्जंतुक करण्यासाठी वापरले जाते.[] तसेच शेवग्याच्या बियांपासून निघणारे तेल, म्हणजे बेन ऑइल, इलेक्ट्रॉनिक वस्तूंत तसेच घड्याळात वंगण म्हणून वापरतात. या तेलाचा उपयोग अत्तरात करतात.

शेवग्याच्या पानांमध्ये ब जीवनसत्त्व हे तत्त्व विपुल प्रमाणात असते. त्यामुळे 'तोंड येणे' या आजारात शेवग्याच्या पानांचे आहारातून सेवन लाभदायक आहे.[ संदर्भ हवा ] शेवग्याची मुळे जंतनाशक असतात.[ संदर्भ हवा ] शेवगाची पाने आरोग्य वर्धक आहेत.

चित्रदालन

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
  1. ^ "शेवगा बियांच्या साह्याने पाणी शुद्धीकरण झाले सोपे". विकासपीडिया. ४ ऑगस्ट २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २६ सप्टेंबर २०२३ रोजी पाहिले.