शेततळे
शेतजमिनीच्या वरील बाजूस पावसाचे वाहून जाणारे पाणी आपत्कालीन वेळी पिकास उपलब्ध होण्याच्या दृष्टीने खोदलेल्या तळ्यास शेततळे असे म्हणतात. हे तळे नाला ओघळीचे काठावरील पड क्षेत्रात घेतले जाते. शेतात तळे करून त्यात भूपृष्ठावरून वाहून जाणारे पाणी साठविणे व त्याचा उपयोग संरक्षित जलसिंचनास करणे हा होय. या तळ्यामध्ये पावसाच्या अनियमितपणामुळे जेव्हा पावसाअभावी पिकास ताण पडतो अशा वेळी या तळ्यात साठविलेल्या पाण्यामधून एखादे दुसरे पाणी पिकास देता आल्यास हमखास पीक येते. जेथे सहजासहजी विहीर खोदणे शक्य होत नाही तेथे वाहून जाणारे पाणी साठविण्यासाइी शेततळे तयार करून पाणी साठविण्याचा कार्यक्रम घेण्यात येतो. पावसाच्या अनियमितपणामुळे जेव्हा पावसाअभावी पिकास ताण पडतो, अशा वेळी या तळ्यात साठविलेल्या पाण्यामधून एक किंवा दोन पाणी पिकास देऊन उत्पादन वाढण्यास मदत होऊ शकते. काही क्षेत्र रब्बी पिकाखालीही आणता येऊ शकते. जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी, मत्स्य उत्पादनासाठी, पिण्यासाठी, घरगुती उपयोगासाठी व जनावरांना पाणी पिण्यासाठी शेततळ्याचा उपयोग होऊ शकतो. ज्या ठिकाणी जमीन जवळ जवळ सपाट असेल त्या ठिकाणी खड्डा खोदून तळे तयार करावे, तर काही ठिकाणी नैसर्गिक घळ अथवा ओघळ अडवून किंवा नाला शेताजवळून वाहत असल्यास त्याला ध्अडवून शेततळ्यात पाणी साठवता येते.
कार्यपद्धती
- शेतजमिनीतील मोक्याच्या जागेची निवड करून चारही बाजूने खणावे. शेततळे किमान १ ते १.५ मीटर खोल असावे.
- या खड्ड्याच्या आतील बाजूने प्लास्टिक पेपर अंथरावा. (याला लायनिंग असे म्हणतात).
- हा प्लास्टिक पेपर साधारण ५०० मायक्रोनचा असावा.
- शेत तळ्याच्या बाजूच्या भिंतींचा कोन साधारण ४५ अंशच्या जवळ असणे महत्त्वाचे असते.
शेततळे तयार करताना घायव्याची काळजी
- शेततळे तयार करताना ज्या जमिनीत पाणी जिरण्याचे प्रमाण कमी आहे, अशा जागेची निवड करावी.
- शेततळ्याचे आकारमान निश्चित करण्यासाठी प्रथम तांत्रिक निकषाप्रमाणे शेततळ्याची जागा निश्चित करावी.
- चाचणी खड्डे घेऊन शेततळ्याची खोली निश्चिेत करावी.
- शेततळ्यात ज्या क्षेत्रातून पाणी येणार आहे, ते पाणलोट क्षेत्र निश्चित करून त्याचे क्षेत्र मोजावे.
- शेतातील पाण्याचा प्रवाह निश्चित करावा.
- शेततळ्याचे आकारमान ठरविताना पडणारा पाऊस व त्याची तीव्रता, पाणलोट क्षेत्राचा आकार व त्याचे गुणधर्म, तळ्याकरिता उपलब्ध जागा, भिजवावयाचे क्षेत्र व त्यात घ्यावयाची पिके निश्चित करावी.
- शेततळ्याचे क्षेत्रफळ एकूण क्षेत्राच्या दोन ते अडीच टक्यांपेक्षा जास्त नसावे. साधारणतः दोन हेक्टर क्षेत्राकरिता ३० X ३० X ३ मी. (२७०० घनमीटर) आकारमानाचे शेततळे खोदावे.
- शेततळे बांधताना माती शेततळ्यात वाहून येणार नाही याची काळजी घ्यावी.
- ज्या ठिकाणी शेततळे बांधावयाचे आहे तो परीसर शक्यतो पावसाच्या पाण्यावर अवलंबून असावा.
शेततळ्याचे लायनिंग अक्मेमॅट (एम व्ही एस अक्मे टेक्नॉलॉजीस् प्रा.लि.)ही गेली २० वर्ष वेगवेगळ्या प्लास्टिकच्या उत्पादनात अग्रेसर आहे. अक्मेमॅट (एम व्ही एस अक्मे टेक्नॉलॉजीस् प्रा.लि.)ची उत्पादने गुणवत्तेसाठी प्रसिद्ध आहेत. कंपनीची उत्पादने ही आय. एस. आय. प्रमाणित आहे. निरंतर संशोधनानंतर एम व्ही एस अक्मे टेक्नॉलॉजीस् प्रा.लि.ने शेत तळ्यासाठी लागणारे एच. डी. पी. ई. अक्मेमॅट लायनिंग बनविले आहे.
वैशिष्ठये
- UV स्टॅबिलाईजड :- यात वापरल्या जाणाऱ्या केमिकल्स मुळे उन्हाच्या परिणामाची तिव्रता कमी होते व लायनिंगचे आयुष्य वाढते.
- ५५० मायक्रोन पेक्षा जास्त जाडी.
- २४ फूट रुंद (पन्हा)
- Is १५३५१:२०१५ प्रमाणित
- सर्व शासकीय अनुदानास पात्र
- शेत तळ्याच्या आकारात बनविता येते.
- १००% गळती विरोधक :- त्यामुळे पाणी टिकून राहते. ह्या सगळ्या वैशिष्ठया मुळे शेततळ्यातील पाणी जास्तकाळ साठवुन ठेवता येते. परिणामी शेतकऱ्यांचा फायदाच होतो.
शेततळ्याचे प्रकार
- नैसर्गिक घळ अथवा ओघळ अडवून
- सपाट जमिनीतील शेततळे.
शेततळ्याचे आकारमान ठरविताना पडणारा पाऊस व त्याची तीव्रता, पाणलोट क्षेत्राचा आकार व त्याचे गुणधर्म, तळ्याकरिता उपलब्ध जागा, भिजवावयाचे क्षेत्र व त्यात घ्यावयाची पिके निश्चित करावी. शेततळ्यात पाणी आत आणणारा चर व बाहेर पाणी वाहून नेणारा चर दगड किंवा गवत लावून व्यवस्थित ठेवावा. जेणेकरून वरील भागातील माती शेततळ्यात वाहून येणार नाही.शेततळ्याच्या योजनेचा प्रस्ताव संबधीत तालुका कृषि अधिकारी यांचे कडे सादर करावा लागतो. ज्या ठिकाणी शेततळे बांधावयाचे आहे तो परीसर शक्यतो पावसाच्या पाण्यावर अवलंबून असावा. कँनाल लाभ क्षेत्रामध्ये शेततळे खोदावयाचे असल्यास पाटबंधारे खात्यातर्फेना हरकत दाखला घेणे बंधनकारक आहे. आपल्या शेतामध्ये पडणा-या पावसाचे पाणी शेततळ्यामध्ये साठवून गरजेप्रमाणे वापरता येते. तसेच परीसरातील भुगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी शेततळ्याचा उपयोग होतो.
फायदे
- पाणलोट क्षेत्रातील भूगर्भातील पाण्याचे पुनर्भरण होते.
- आपत्कालीन स्थितीत पिकास पाणी देण्यासाठी पाणी उपलब्ध होऊ शकते.
- पूरक सिंचनामुळे पिकाच्या उत्पादनात लक्षणीय वाढ होते.
- चिबड व पाणथळ जमीन सुधारणेसाठी शेततळयाचा चांगला उपयोग होतो.
- मत्स्यसंवर्धनासाठी उपयोग होतो
- पिकावर औषधे फवारणीसाइी शेतात मुबलक पाणी उपलब्ध होते
संदर्भ शेततळे
http://krishi.maharashtra.gov.in/1199/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%A4%E0%A4%B3%E0%A5%87
http://marathi.destatalk.com/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%A4%E0%A4%B3%E0%A5%87/ Archived 2018-05-14 at the Wayback Machine.
https://aaqua.persistent.co.in/aaqua/forum/viewthread?thread=9631[permanent dead link]