शेखर मुंदडा
शेखर मुंदडा | |
---|---|
जन्म | शेखर मुंदडा १७ मार्च १९७२ कोपरगांव |
निवासस्थान | पुणे , पुणे जिल्हा, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
टोपणनावे | भाऊ |
नागरिकत्व | भारतीय |
शिक्षण | एमबीए |
प्रशिक्षणसंस्था | आय.एम.ई. |
पेशा | समाजसेवा |
प्रसिद्ध कामे | समाजसेवा |
मूळ गाव | कोपरगांव , अहमदनगर |
पदवी हुद्दा |
|
कार्यकाळ | १९९० पासून |
राजकीय पक्ष | भाजप |
धर्म | हिंदू |
जोडीदार | स्वाती बिहाणी - मुंदडा |
अपत्ये | साक्षी , सक्षम |
वडील | रामबिलास मुंदडा |
पुरस्कार | वर्ल्ड बुक रेकॉर्ड , लंडन [२] |
शेखर रामबिलास मुंदडा यांचा जन्म १७ मार्च १९७२ रोजी कोपरगाव, जिल्हा अहमदनगर येथील कुटुंबात झाला.
आज महाराष्ट्रात दोन हजार पाचशे पेक्षा जास्त सामाजिक संस्था कार्यरत आहेत; परंतु या संस्थांना चांगलं काम करण्यासाठी व देणगी मिळवण्यासाठी मार्गदर्शनाची गरज असल्याचे शेखर यांच्या लक्षात आलं म्हणून त्यांनी एप्रिल २०१७ साली महा एनजीओ फेडरेशन ची स्थापना केली. या फेडरेशनमध्ये २५०० सामाजिक संस्था जोडल्या गेल्या असून शेखर हे या संस्था व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या सक्षमीकरणासाठी विविध कार्यशाळा, प्रशिक्षण शिबिरे आयोजित करतात.[३] या उपक्रमात त्यांनी आजपर्यंत १२० संस्थांना बेचाळीस लाख रुपयांपर्यत आर्थिक अथवा वस्तू स्वरूपात सहकार्य केलं आहे. आळंदी-पंढरपूर बारीत भाविकांना वारकरी सेवा रथाचे आयोजन, दुष्काळग्रस्त जनावरांना चारा बाटप, शेतकरी युवक यांच्यासाठी कीर्तनाद्वारे प्रबोधन असे अनेक अभिनव उपक्रम ते महा एनजीओ फेडरेशन मार्फत राबवतात.[४] कोविड १९ च्या काळात अनेक गरजूंना मदत करण्याची संधी मिळाली. संपूर्ण जगाला प्रभावित करणाऱ्या या विषाणूमुळे संपूर्ण मानवजातीला जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. अशा परिस्थितीत अनेक गरजू लोकांना मदतीची गरज आहे. शेखर मुंदडा यांनी महाएनजीओ फेडरेशनच्या वतीने निर्माण केलेल्या पंधराशे एनजीओंमार्फत गरजूंना दररोज एक हजारपेक्षा जास्त फूड पॅकेट, वीस हजार मास्क आणि पाच हजार फेस शील्ड मास्क, १२००० रेडी टू ईट सुहाना मसाला पॅकेटचं वाटप, तीस ओल्ड अेज होम्स व बावीस स्पेशल चाईल्ड स्कूल्सला मदत, अठरा हजारपेक्षा जास्त फॅमिली होम किटचं वितरण, पाचशेहून जास्त रक्तदान शिबिरांचे आयोजन, पी.एम.सी कामगार, पोलीस व सरकारी कर्मचारीं यांना फेस शिल्ड मास्कचं वितरण करण्यात आलं आहे. [५] १७ जिल्ह्यांमध्ये ९० हजारांहून जास्त गरजू लोकांना मदतीचा हात दिला आहे.[६] शेखर मुंदडा प.पू. श्री. श्री. रवीशंकरजी यांचे महाराष्ट्रातील सर्वांत निकटवर्तीय मानले जातात. आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराशी शेखर हे समरस झालेले आहेत. सध्या ते जास्तीत जास्त वेळ आर्ट ऑफ लिव्हिंगच्या उपक्रमांसाठी देतात. यातून त्यांना मोठं आत्मिक समाधान मिळतं.अशा या सेवाभावी वृत्ती असणाऱ्या व्यक्तिमत्त्वाला समाजातील अनेक घटकांनी वेगवेगळ्या पुरस्कारांनी गौरविलं आहे.[७]
भूषावलेली पदे
- अध्यक्ष : महाराष्ट्र गोसेवा आयोग
- संस्थापक : महा एनजीओ फेडरेशन[८]
- संचालक : एनआरडीसी , दिल्ली [९] [१०]
- राज्य प्रतिनिधी : आर्ट ऑफ लिविंग संस्था
- कार्याध्यक्ष : माहेश्वरी विद्या प्रचारक मंडल
- प्रदेश कार्यकारणी सदस्य : भाजप , महाराष्ट्र [११]
- संयोजक : सेवा प्रकोष्ठ , भाजप , महाराष्ट्र [१२][१३]
पुरस्कार[ संदर्भ हवा ]
- वारकरी सेवा गौरव पुरस्कार [१४]
- कोपरगाव भूमिपुत्र पुरस्कार
- राजीव गांधी शिरोमणी पुरस्कार
- राष्ट्रीय रत्न पुरस्कार
- इंदिरा गांधी सद्भावना पुरस्कार
- राष्ट्रीय उद्योजक पुरस्कार, दिल्ली
- बिझनेस एक्सलन्स अॅवॉर्ड
- एबीपी इंडिया एस.एम. ई १०० पुरस्कार
- राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार
- वर्ल्ड बुक रेकॉर्ड, लंडन[१५]
- सुरानंद सामाजिक पुरस्कार[१६]
- माहेश्वरी समाज पुरस्कार [१७]
संदर्भ
- ^ "संग्रहित प्रत". 2022-11-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-11-10 रोजी पाहिले.
- ^ https://tarunbharat.com/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%A1%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1/
- ^ https://policenama.com/maha-ngo-federation-provides-financial-assistance-of-rs-5-lakhs-to-96-organizations-in-maharashtra-participation-of-bjp-social-connect/
- ^ https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/propagation-of-drought-affected-by-saints/articleshow/69526940.cms
- ^ https://tarunbharat.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE/
- ^ https://www.lokmat.com/jalgaon/distribution-rations-muktai-temple-servants-a688/
- ^ https://tarunbharat.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE/
- ^ https://www.tofler.in/maha-ngo-federation/company/U93090PN2018NPL176982
- ^ "संग्रहित प्रत". 2022-11-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-11-10 रोजी पाहिले.
- ^ "संग्रहित प्रत" (PDF). 2022-11-11 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2022-11-11 रोजी पाहिले.
- ^ https://www.facebook.com/SarkarnamaNews/posts/1451525711723708/
- ^ https://www.sarkarnama.in/jilha/warkaris-support-shekhar-mundada-pune-graduates-64786
- ^ https://www.dainikprabhat.com/mp-girish-bapat-birthday-special-punes-praoud/
- ^ https://maharashtralokmanch.com/2022/06/14/shekhar-mundada-honored-with-warkari-seva-gaurav-award/
- ^ https://tarunbharat.com/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%A1%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1/
- ^ https://www.esakal.com/pune/todays-latest-marathi-news-01004
- ^ https://maharashtralokmanch.com/2022/09/19/shekhar-mundada-honored-with-special-service-award-by-maharashtra-pradesh-maheshwari-sabha/