Jump to content

शेंगदाणा चटणी

शेंगदाणे
शेंगदाणा चटणी

शेंगदाणा चटणी किंवा शेंगा चटणी हा एक मराठी खाद्य पदार्थ आहे.

शेंगदाणे भाजून किंवा न भाजता, त्याची जाडीभरडी किंवा साधारण बारीक पूड करून त्यात लसून, तिखट, मिठ, जिरेपूड, तेल व इतर मसाल्याचे पदार्थ घालून ही चटणी बनवली जाते. विविध प्रकारच्या चटण्या महाराष्ट्रातील मराठी जेवणात तोंडी लावण्यासाठी म्हणून वाढल्या जातात. शेंगदाणा चटणी हे तर सोलापूर जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे. सामान्य माणसात अशी मान्यता आहे उखळात किंवा दगडी खलबत्त्यात कुटून चटणी तयार केल्यास तिची चव आणखी सुधारते.