शृंगेरी
?शृंगेरी (ಶೃಂಗೇರಿ) कर्नाटक • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जिल्हा | चिकमगळूर |
लोकसंख्या | ४,२५३ (२००१) |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड | • ५७७१३९ • +०८२६५ • KA-१८ |
शृंगेरी हे कर्नाटक राज्यातील एक तीर्थक्षेत्र व आद्य शंकराचार्य यांनी स्थापन केलेल्या प्रारंभीच्या मठाचे स्थान आहे. हा मठ शारदा पीठ म्हणून ओळखला जातो. तो चिकमगळूर जिल्ह्यात तुंग नदीकाठी आहे. शृंगेरी हे नाव ऋष्यशृंग मुनींवरून पडलेले आहे. शृंग म्हणजे शिंग आणि गिरी म्हणजे पर्वत म्हणजेच ऋष्यशृंग मुनी ह्यांचे तपस्या स्थळ होय.
माहिती
याला शृंगेरी ज्ञानमठ, शृंगेरी पीठ असेही म्हणतात. या मठांतर्गत दिक्षा प्राप्त करणाऱ्या संन्याश्याच्या नावाअखेरीस सरस्वती/भारती/पुरी संप्रदाय असे नाव जोडले जाते. या मठाचे महावाक्य हे 'अहं ब्रम्हास्मि'असे आहे. या मठात चार वेदांपैकी यजुर्वेद हा वेद येतो.[१]
संदर्भ
- ^ "आदि गुरु शंकराचार्य ने चारों दिशाओं में स्थापित किए थे मठ, जानें- कहां स्थित हैं ये चार मठ". abplive.com (हिंदी भाषेत). ३० नोव्हेंबर २०२३ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २९ नोव्हेंबर २०२३ रोजी पाहिले.