शुभम बाल-किशोर व युवा मराठी साहित्य संंमेलन
प्रख्यात साहित्यिक आतिश सोसे यांनी मान्यवर सहकारी मंडळींसोबत दि.१३ सप्टेबर १९९५ रोजी स्थापन केलेल्या आणि पंचवीस वर्षांपासून साहित्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या आणि अकोला जिल्ह्यात स्थापन झालेल्या शुभम मराठी बाल,कुमार,युवा व नवोदित साहित्य मंडळ बाल,कुमार, युवा व नवोदित मराठी साहित्य संंमेलन भरवते, सन २०२०पर्यंत अशी ९ संमेलने झाली आहेत. ९ वे शुभम बाल,कुमार,युवा व नवोदित मराठी साहित्य संमेलन, धुळे येथे २०२० सालच्या मार्चमध्ये झाले. सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते व साहित्यिक तुषार बैसाने हे संमेलनाध्यक्ष होते.दहावे संमेलन लवकरच आयोजित केले जाणार असल्याची माहिती दिली.