Jump to content

शुभदा गोगटे

शुभदा शरद गोगटे (२ सप्टेंबर १९४३) मराठी साहित्यातील एक प्रथितयश लेखिका आहेत. त्यांनी कथासंग्रह, कादंबरी, विज्ञानकथा, ललित लेख असे वैविध्यपूर्ण साहित्यप्रकार हाताळले आहेत.

खंडाळ्याच्या घाटासाठी’ हे त्यांचे एक गाजलेले पुस्तक आहे.

शुभदा गोगटे यांची प्रकाशित पुस्तके

  • अयोध्या आणि हिंदू समाजापुढील प्रश्न (अनुवाद, मूळ इंग्रजी लेखक - कॉन्‍राड एल्स्ट, सह‍अनुवादक - वि.ग. कानिटकर)
  • अस्मानी (विज्ञानकथा)
  • खंडाळ्याच्या घाटासाठी
  • घर (कथासंग्रह, गूढकथा)
  • चला जाणून घेऊया - तणाव व राग (माहितीपर)
  • चला जाणून घेऊया - फेंग शुई (माहितीपर)
  • चला जाणून घेऊया - रेकी (माहितीपर)
  • चला जाणून घेऊया - सुख (माहितीपर)
  • चला जाणून घेऊ या - स्मरणशक्ती कशी वाढवावी? (माहितीपर)
  • निरामय यशासाठी ध्यान (माहितीपर)
  • यंत्रायणी (विज्ञान कादंबरी)
  • वसुदेने नेला कृष्ण (विज्ञानकथा)
  • सांधा बदलताना (ब्रिटिश आमदनीत रेल्वेसेवा सुरू होण्याच्या काळात ’बडोदा संस्थानात झालली राजकीय व सामाजिक उलथापालथ’ या विषयावरील कादंबरी)
  • हृदयविकार कमी करण्यासाठी काय करावं, हृदयरुग्णांची जीवनशैली (माहितीपर)
  • हृदयविकार निवारण (माहितीपर)