Jump to content

शीला भाटिया

شیلا بھاٹیا (pnb); শীলা ভাটিয়া (bn); শীলা ভাটিয়া (as); Sheila Bhatia (es); Sheila Bhatia (ast); Sheila Bhatia (en); ଶିଲା ଭାଟିଆ (or); Sheila Bhatia (nl); शीला भाटिया (hi); शीला भाटिया (mr); شيلا ڀاٽيا (sd); Sheila Bhatia (fi); Sheila Bhatia (sq); شیلا بھاٹیا (ur); ਸ਼ੀਲਾ ਭਾਟੀਆ (pa); ஷீலா பாட்டியா (ta) بھارتی ڈراما نگار (ur); dichter (nl); ଭାରତୀୟ କବି ଓ ନାଟକ ଲେଖକ (or); भारतीय कवि, नाटककार (mr); پنجابي ڪويتا لکندڙ شاعرا (sd); ਪੰਜਾਬੀ ਕਵੀ (pa); Punjabi poet (en); भारतीय कवि, नाटककार (hi); পাঞ্জাবী কবি (as); পাঞ্জাবি কবি (bn)
शीला भाटिया 
भारतीय कवि, नाटककार
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखमार्च १, इ.स. १९१६
सियालकोट
मृत्यू तारीखफेब्रुवारी १७, इ.स. २००८
व्यवसाय
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

शीला भाटिया (१ मार्च १९१६ - १७ फेब्रुवारी २००८) ह्या भारतीय कवयित्री, नाटककार, आणि भारतीय कलाप्रकारांच्या संवर्धनासाठी दिल्ली येथील दिल्ली आर्ट थिएटरच्या संस्थापक होत्या.[][] त्या अखिल भारतीय प्रगतिशील लेखक संघाशी पण संबंधीत होत्या.[][] पंजाबी ओपेरा, एक भारतीय नृत्य नाटकाचा प्रकार आहे ज्यामध्ये ओपेरा सारख्या हालचालींचा समावेश होतो. १९५० व १९६० च्या दशकात हा शिला भाटिया यांनी निर्माण व प्रसिद्ध केला आहे.[][][][]

हिंदी आणि उर्दू नाटकांसाठी त्यांना विविध पुरस्कार मिळाले. १९७१ मध्ये भारत सरकारच्या पद्मश्री, या चौथ्या भारतीय नागरी पुरस्काराने त्या सन्मानित आहेत.[] एका दशकानंतर त्यांना १९८२ मध्ये नाटक दिग्दर्शनासाठी संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला.[१०] त्यानंतर १९९७ मध्ये मध्यप्रदेश सरकारचा कालिदास सन्मान पुरस्कार मिळाला.[११]

चरित्र

शीला भाटिया यांचा जन्म १ मार्च १९१६ रोजी ब्रिटिश भारतातील सियालकोट येथे झाला होता जे सध्याच्या पाकिस्तानमध्ये आहे.[][११] बीए पदवी मिळविल्यानंतर त्यांनी शिक्षण (बीटी) मध्ये पदवी संपादन केली आणि लाहोरमध्ये गणिताच्या शिक्षिका म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी नंतर स्वतःला भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सामील केले सामील केले.[] अभिनय विभागाच्या प्रमुख म्हणून त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्येही काम केले.

भाटियाची पहिली निर्मिती कॉल ऑफ द व्हॅली हे संगीत नाटक होते जे विभाजनाच्या आधिच्या काश्मीरमधील जीवनाचे चित्रण करत होते.[][][१२] त्यानंतर हीर रांझा (१९५७), दर्द आएगा दाबे पाव (१९७९), सुलगदा दर्या (१९८२), ओमार खय्याम (१९९०), नसीब (१९९७), गालिब कौन था (१९७२), किस्सा यह औरत का (१९७२), हवा से हिप्पी तक (१९७२) आणि उर्दूतील ये इश्क नहीं आसन (१९८०), अशा ६०हून अधिक निर्मीत्या त्यांनी केल्या आहेत. सुलगदा दर्या या नाटकात त्यांनी सूफी कवी बुल्ले शाहच्या कवीता वापरल्या आहेत.[१३] नाटकांकरिता त्यांनी इंग्लंड, पोलंड, रुसिया, चेकोस्लोवाकिया, जर्मनी, फ्रान्स, इटली, इंडोनेशिया आणि सिंगापूर येथेही प्रवास केला होता.[११][][१४][१२] फैज अहमद फैज या प्रसिद्ध कवीच्या त्या अनुयायी असून, भाटिया यांनी पार्लो दा झक्कर (१९५०) या सारखे काव्यसंग्रह व काव्याशास्त्रावर १० प्रकाशनेही केली आहेत.[१५][१३] कालांतराने दिल्ली आर्ट थिएटर बंद पडले कारण त्यास योग्य निधी उपल्बध होउ शकला नाही व कलाकारांचा रोख दूरचित्रवाणी कडे वळला होता.

शीला भाटिया यांचे १७ फेब्रुवारी २००८ रोजी सकाळी वयाच्या ९१व्या वर्षी निधन झाले.[]

संदर्भ

  1. ^ a b Ananda Lal (ed.) (2004). The Oxford Companion to Indian Theatre. Oxford University Press. ISBN 9780195644463.CS1 maint: extra text: authors list (link)
  2. ^ "Aesthetics of Indian Feminist Theatre". Rup Katha. 2015. 30 May 2015 रोजी पाहिले.
  3. ^ Susie J. Tharu, Ke Lalita (1993). Women Writing in India: The twentieth century. Feminist Press. p. 688. ISBN 9781558610293.
  4. ^ a b c "Rich tributes paid to Sheila Bhatia". The Hindu. 23 February 2008. 30 May 2015 रोजी पाहिले.
  5. ^ a b c d "Shiela Bhatia – A legend of Indian Operas passes away". Stage Buzz. 2008. 2016-03-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 30 May 2015 रोजी पाहिले.
  6. ^ Stanley Hochman (1984). McGraw-Hill Encyclopedia of World Drama. McGraw-Hill. p. 2900. ISBN 9780070791695.
  7. ^ Colin Chambers (2006). Continuum Companion to Twentieth Century Theatre. A&C Black. p. 896. ISBN 9781847140012.
  8. ^ Gurcharan Singh (1990). Studies in Punjab History & Culture. Enkay Publishers. p. 281. ISBN 9788185148298.
  9. ^ "Padma Shri" (PDF). Padma Shri. 2015. 2015-10-15 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 11 November 2014 रोजी पाहिले.
  10. ^ "Sangeet Natak Akademi Award". Sangeet Natak Akademi. 2015. 30 May 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 30 May 2015 रोजी पाहिले.
  11. ^ a b c Kartik Chandra Dutt (1999). Who's who of Indian Writers, 1999: A-M. Sahitya Akademi. p. 1490. ISBN 9788126008735.
  12. ^ a b Manoj Sharma (16 November 2011). "Capital's cultural affair began in 50s". Hindustan Times. 2015-05-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 30 May 2015 रोजी पाहिले.
  13. ^ a b Amaresh Datta (1988). Encyclopaedia of Indian Literature, Volume 2. Sahitya Akademi. p. 987. ISBN 9788126011940.
  14. ^ Habib Tanvir (2014). Memoirs. Penguin. p. 400. ISBN 9789351182023.
  15. ^ "India, whose love could have killed him". Dawn. 13 February 2011. 30 May 2015 रोजी पाहिले.