Jump to content

शीला बालाजी

शीला बालाजी
प्रशिक्षणसंस्थास्टेला मॅरिस कॉलेज, चेन्नई
प्रसिद्ध कामे साळीच्या विविध प्रजातीचे संवर्धन
पदवी हुद्दा सेवाभावी संस्थेच्या विश्वस्त
संचालकमंडळाचे सभासद एम फॉर सेवा
जोडीदार टी के बालाजी
वडील टी एस श्रीनिवासन
आई प्रेमा श्रीनिवासन
पुरस्कारनारी शक्ती पुरस्कार

शीला बालाजी ह्या एक भारतीय महिला असून त्या भारतीय शैक्षणिक विना-नफा संस्था (NGO) 'एम फॉर सेवा' (AIM For Seva)चे नेतृत्व करतात. भारतात मोफत शिक्षण देणाऱ्या सर्वात मोठ्या संस्थांपैकी ही एक संस्था आहे.[] त्यांची अजून एक ओळख म्हणजे त्या साळीच्या (तांदळाच्या) विविध प्रकारच्या जातींचे संकलन आणि संवर्धन करतात. याची सुरुवात चार जातींपासून झाली होती आणि आता त्यांच्याकडे साळीच्या सुमारे तीस जाती आहेत. शीला यांना या प्रमुख दोन कार्यांसाठी भारतातील, खासकरून स्त्रियांना देण्यात येणारा सर्वोच्च पुरस्कार, नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.[]

वैयक्तिक आयुष्य

शीला या टीव्हीएस समूहाचे प्रमुख संस्थापक 'टीव्ही सुंदरम अय्यंगार' यांची नात आहेत. त्या 'एम फॉर सेवा' नावाच्या एका विना-नफा संस्थेच्या (एनजीओ) व्यवस्थापकीय विश्वस्त आणि अध्यक्षा आहेत.[] ही संस्था तामिळनाडूतील मांजाकुडी येथे एक मोठी शाळा चालवते. तसेच या संस्थेची संपूर्ण भारतात १०० वसतिगृहे देखील आहेत. ही भारतातील मोफत शिक्षण देणारी एक सर्वात मोठी संस्था आहे.[] शीला या स्वामी दयानंद एज्युकेशनल ट्रस्टची देखील जबाबदारी पार पाडतात.[]

भातशेती आणि प्रयोग

त्यांच्या शाळेच्या जमीनीवर भातशेती केल्या जात असे . एक दिवस शीला यांच्या लक्षात असे आले की तेथील एक शेतकरी साळीवर (तांदळावर) मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांचा आणि औषधींचा वापर करत आहे. त्यांनी त्या शेतकऱ्यास सावध केले की, ती रसायने त्याच्यासाठी अत्यंत हानिकारक आहेत, त्यामुळे त्या शेतकऱ्याने या रसायनांचा वापर थांबवावा. तेव्हा त्या शेतकऱ्याने त्यांना उत्तर दिले की त्या साळीवर विविध प्रकारच्या रासायनिक औषधींचा वापर केल्या शिवाय भात शेती करणे अवघड आहे, अन्यथा साळीचे उत्पादन कमी होईल. शीला यांनी अधिक माहिती आणि अभ्यास करून तेथील ४० एकर जमिनीवर काही विशिष्ट जातीच्या तांदळाची लागवड करायचे ठरवले.[]

एक असा अंदाज आहे की, सुमारे १४,००० वर्षांपूर्वी भारतात तांदूळ आल्यापासून ते आजपर्यंत सुमारे १,१०,००० वाण निर्माण झाले होते. त्यापैकी आजमितीस केवळ तांदळाच्या ६,००० जाती अस्तित्वात आहेत [] इ.स. २०१३ मध्ये बालाजीने मांजक्कुडी येथे अन्नधान्यांना समर्पित 'धान्य महोत्सवाचे' आयोजन केले. दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या या महोत्सवाने भातशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आकर्षित केले आणि यामुळे अजून काही जुन्या तांदळाच्या जाती त्यांना भेटल्या.[] शीला यांनी भाताच्या चार जातीचे संवर्धन करण्यास सुरुवात केली आणि आता त्यांच्याकडे जवळपास तीस जातीच्या साळीचे बियाणे जमा झाले आहेत. तांदळाची लागवड फायद्याची करण्यासाठी त्यांनी चेन्नईमध्ये एक विक्री केंद्र उघडले जिथे त्यांच्या तांदळाच्या विविध वाणांची खरेदी केल्या जाऊ शकते. पॅकेजिंग वर मांजक्कुडी गावाचा नकाशा लोगो म्हणून वापरला जातो तसेच त्यावर तांदळाचे गुणधर्म आणि पारंपरिक दृष्ट्या दावा केलेल्या आरोग्यविषयक फायद्यांचे वर्णन सुद्धा नोंदवल्या जाते.[]

इ.स. २०११ मध्ये त्यांचे 'स्वामी दयानंद सरस्वती: योगदान आणि लेखन' हे पुस्तक प्रकाशित झाले.[] तर इ.स. २०१५ मध्ये अजून एक पुस्तक 'विदाउट सेकंड: कॉन्सेप्ट्स ऑफ नॉन ड्युअलिटी' प्रकाशित झाले.[]

इ.स. २०१८ मध्ये शीला बालाजी यांना नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. [][] हा पुरस्कार भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली येथे भारताचे पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितित प्रदान करण्यात आला. त्या वर्षी सुमारे ४० लोक किंवा संस्थांना सन्मानित करण्यात आले. यात त्यांना पुरस्कार आणि १,००,००० रुपये बक्षीस दिल्या गेले.[]

संदर्भ

  1. ^ a b Staff Reporter (2014-02-02). "Aim for Seva sets up 100th free student home". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2021-01-14 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2021-01-13 रोजी पाहिले.
  2. ^ a b c d "Meet Ms. Sheela Balaji, #NariShakti Puraskar 2017 awardee". PIB India. 7 March 2018. 14 January 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 13 January 2021 रोजी पाहिले.
  3. ^ "Board of Trustees". www.sdet.in. 2023-02-27 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2023-02-25 रोजी पाहिले.
  4. ^ a b c "This Woman's Preserved 30 Indigenous Rice Varieties & Is Making Sure You Get a Grain of History Too!". The Better India (इंग्रजी भाषेत). 2017-07-21. 2021-01-14 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2021-01-13 रोजी पाहिले.
  5. ^ "Pre-publication notice for Swami Dayananda Saraswati: Contributions & Writings" (PDF).
  6. ^ Balaji, Sheela (2015). Without a Second: Concepts of Non Duality (इंग्रजी भाषेत). ISBN 978-93-80049-83-0. 2021-01-14 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2021-01-13 रोजी पाहिले.
  7. ^ "Nari Shakti Puraskar - Gallery". narishaktipuraskar.wcd.gov.in. 2021-01-14 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2021-01-13 रोजी पाहिले.
  8. ^ "International Women's Day: President Kovind honours 39 achievers with 'Nari Shakti Puraskar'". The New Indian Express. 2021-01-14 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2021-01-08 रोजी पाहिले.