Jump to content

शिसे

शिसे,  ८२Pb
शिसे
सामान्य गुणधर्म
साधारण अणुभार (Ar, standard) २०७.२ ग्रॅ/मोल
शिसे - आवर्तसारणीमधे
हायड्रोजनहेलियम
लिथियमबेरिलियमबोरॉनकार्बननत्रवायूप्राणवायूफ्लोरीननिऑन
सोडियममॅग्नेशियमॲल्युमिनियमसिलिकॉनस्फुरदगंधकक्लोरिनआरगॉन
पोटॅशियमकॅल्शियमस्कॅन्डियमटायटॅनियमव्हेनेडियमक्रोमियममँगेनीजलोखंडकोबाल्टनिकेलतांबेजस्तगॅलियमजर्मेनियमआर्सेनिकसेलेनियमब्रोमिनक्रिप्टॉन
रुबिडियमस्ट्रॉन्शियमयिट्रियमझिर्कोनियमनायोबियममॉलिब्डेनमटेक्नेटियमरुथेनियमऱ्होडियमपॅलॅडियमचांदीकॅडमियमइंडियमकथीलअँटिमनीटेलरियमआयोडिनझेनॉन
CaesiumBariumLanthanumCeriumPraseodymiumनियोडायमियमPromethiumSamariumEuropiumGadoliniumTerbiumDysprosiumHolmiumErbiumThuliumYtterbiumLutetiumHafniumTantalumTungstenRheniumOsmiumIridiumPlatinumसोनेपाराThalliumLeadBismuthPoloniumAstatineRadon
फ्रान्सियमरेडियमॲक्टिनियमथोरियमप्रोटॅक्टिनियमयुरेनियमनेप्चूनियमप्लुटोनियमअमेरिसियमक्युरियमबर्किलियमकॅलिफोर्नियमआइन्स्टाइनियमफर्मियममेंडेलेव्हियमनोबेलियमलॉरेन्सियमरुदरफोर्डियमडब्नियमसीबोर्जियमबोह्रियमहासियममैटनेरियमDarmstadtiumRoentgeniumCoperniciumNihoniumFleroviumMoscoviumLivermoriumTennessineOganesson
कथील

Pb

थॅलियमशिसेबिस्मथ
अणुक्रमांक (Z) ८२
गणअज्ञात गण
भौतिक गुणधर्म
स्थिती at STP घन
विलयबिंदू ६००.६ °K ​(३२७.५ °C, ​६२१.४ °F)
क्वथनबिंदू (उत्कलनबिंदू) २०२२ °K ​(१७४९ °C, ​३१८० °F)
घनता (at STP) ११.३४ ग्रॅ/लि
आण्विक गुणधर्म
इतर माहिती
संदर्भ | शिसे विकिडेटामधे

शिसे (चिन्ह: Pb ; इंग्लिश: Lead, लेड ; अणुक्रमांक: ८२) हे एक मृदू, वजनदार व उष्णतारोधक मूलद्रव्य आहे. हे मूलद्रव्य गंजरोधक, जड, लवचीक आणि ठोकून आकार देण्याजोगे आहे. याचा रंग निळा-राखाडी असून, या मूलद्रव्याची गणना धातूमधे होते.

इतिहास

हा धातू किमान ५ हजार वर्षांपासून मानवास माहीत आहे.

वापर

शिशाचा वापर यापूर्वी इमारतींचे बांधकाम साहित्यात, सॉल्डरिंग करण्यासाठी, चिनी मातीच्या वस्तू चमकविण्यासाठी, रंगकामात आणि पाणी वाहून नेणाऱ्या नळांमध्ये मध्ये केला जात असे. सध्या त्याचा प्रमुख वापर शिसे व अल्क प्रकारच्या विद्युतघट संचात केला जातो. वाहने, जहाजे आणि विमाने यांच्या इलेक्ट्रिकल सिस्टम या संचांवर चालतात आणि अवलंबून असतात. काही वेळा तर संचातूनच प्रत्यक्ष ऊर्जेचा पुरवठा होतो. कार्यालयीन इमारती, शाळा इत्यादींना यांना ध्वनिरोधक करण्यासाठीही याचा वापर होतो. इस्पितळामध्ये एक्स-रे आणि गामा-किरण रोखण्यासाठी शिसाचे पत्रे उपयोगी पडतात. किरणोत्सर्ग रोखण्यासाठी कायमस्वरूपी म्हणून तसेच अण्वस्त्र साहित्याची वाहतूक करताना शिसे वापरतात. दारूगोळा, रंग, काच, रबर, पोलाद इत्यादी उत्पादनांमध्ये या खनिजाचा उपयोग होतो.

आढळ

भारत

भारतात प्रामुख्याने राजस्थान, आंध्र प्रदेश, तमिळनाडू या राज्यांत शिशाच्या खाणी आहेत. याशिवाय गुजरात, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, ओडिशा इत्यादी राज्यांत काही प्रमाणात शिसे सापडते.

पुनर्वापर

भारतात शिशाच्या साठ्यांची कमतरता असल्याने येथे शिशाची आयात आणि शिशाचा पुनर्वापर करावा लागतो.

बाह्य दुवे

  • "एमसीएक्स बाजाराच्या संकेतस्थळावरील शिश्याच्या मालव्यापारासंबंधीचे पान". 2016-04-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-20 रोजी पाहिले.