शिसम
शिसम तथा काळा रूख एक मोठा वृक्ष आहे. या झाडाची पाने आमटीच्या झाडाच्या पानांसारखीच दिसतात. शिसम हे फारच मजबूत, किमती लाकूड आहे. खोडाचा आतील भाग काळ्या रंगाचा असतो. मोठ्या लाकडापासून घरासाठी पाट्या, मुंड्या (खांब) टेबल, खुर्च्या, दरवाजे, खिडक्या, पलंग, बैलगाडी, बंडीचे 'भोवरे' (चाक) व इतर सर्व शेतीचे अवजार बनवतात. लहान काड्या जाळण्यासाठी वापरतात. पण हे झाड तोडले तर खूप दंड भरावा लागतो.
उपयोग
- शिसम या वृक्षाचे साल वाळवून, त्याचा भुरका करून, कुठे खांडूक झाला, बेंड किंवा फोड झाला, जखम झाली, मार बसला तर त्यात कथ्थ्यासारखे भरतात.
- पोटदुखी असेल किंवा 'रक्तशुला' किंवा 'विटाळशुला' असेल (मासिक पाळीच्या वेळी पोटात दुखणे) तर शिसमची साल बारीक कांडून. कांडीत किंवा मोहाच्या 'डारूत' (दारूत) मिसळून पाच-सहा मात्रा प्यायला देतात.
- शिसम वृक्षाच्या पाल्याचा रस कर्करोग (क्ॅन्सर) वर अत्यंत उपयोगी असल्याचे सांगतात. आपले औषध सुरू ठेवून, याचे पाल्याचा रस १०-१५ दिवस घ्यावा. नंतर काही दिवस नुस्ता पाला चावावा. याने कर्करोगाचे रुग्णांत आश्चर्यकारक बदल दिसून येईल असा दावा केल्या जातो. [ संदर्भ हवा ]