Jump to content

शिवामूठ

भगवान शिव मूर्ती

शिवामूठ ही एक धार्मिक संकल्पना आहे.[]श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी भगवान शंकराला एक मूठ धान्य अर्पण करणे म्हणणे शिवामूठ होय. प्रत्येक सोमवारी वेगवगळे धान्य एक मूठ घेऊन ते शिवाच्या पिंडीवर वाहिले जाते. त्यांनतर शिवाचे पूजन केले जाते, त्याला नैवेद्य दाखविला जातो. या दिवशी महिला आणि पुरुष उपवास करतात.[]

व्रताचे स्वरूप

महाराष्ट्रात तसेच भारताच्या अन्य प्रांतात नववधूने विवाहानंतर पाच वर्षे हे व्रत करण्याचा संकेत रूढ आहे. पहिल्या सोमवारी तांदूळ व त्यानंतर प्रत्येक सोमवारी तीळ, मूग, जवस, सातू या क्रमाने शिवामूठ वाहिली जाते. पाचव्या वर्षी व्रताची समाप्ती करताना पुरोहित व्यक्तीला दान, दक्षिणा दिली जाते.[] शिव पूजन करताना मंदिरात जावे, किंवा घरातील शिवपिंडीला मूठ धान्य वहावे. तसे करणे शक्य नसल्यास घरी पाटावर शिवपिंडी काढून तिला शिवामूठ वहावी असे विविध पर्याय उपलब्ध आहेत.[]

संदर्भ

  1. ^ "Sawan Somwar 2023: जानिए सावन सोमवार और शिवामूठ व्रत का महत्व और पूजा विधि". Amar Ujala (हिंदी भाषेत). 2024-08-02 रोजी पाहिले.
  2. ^ Śrāvaṇa, Bhādrapada. Mahārāshṭra Rājya Lokasāhitya Samitīcyāvatīne Mahārāshṭra Śānācyā Śikshaṇa Vibhāgā. 1985.
  3. ^ author/online-lokmat (2023-08-16). "श्रावणी सोमवार: शिवामूठ वाहण्याची योग्य पद्धत कोणती? दानाचे महत्त्व सांगणारी अद्भूत परंपरा". Lokmat. 2024-08-02 रोजी पाहिले.
  4. ^ author/online-lokmat (2023-09-03). "तिसरा श्रावणी सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, योग्य पद्धत, मंत्र, महत्त्व अन् परंपरा". Lokmat. 2024-08-02 रोजी पाहिले.