शिवाजी महाराजांची सैन्य रचना
शिवाजी महाराजांची सैन्य रचना साधारणपणे खालील प्रकारची होती.
पायदळ
- ९ शिपायांवर (पावलोक) -१ नाईक
- १० नाईकांवर - १ हवालदार
- ३ हवालदारांवर - १ जुमलेदार
- १० जुमलेदारांवर - १ हजारी मनसबदार
- ७ एक हजारी मनसबदारांवर - सप्त हजारी मनसबदार
वरील सर्वांचा अधिकारी- सरनोबत/सरसेनापती
घोडदळ
यात दोन प्रकार असत. एक 'बारगीर' आणि 'शिलेदार'. बारगीर म्हणजे सरकारी घोडेस्वार.यास सर्व सामान शिवाजी महाराजांतर्फे दिल्या जायचे शिलेदार म्हणजे ज्याच्याकडे स्वतःचा घोडा व आवश्यक सामान आहे तो. त्यात तैनाती फौज व राखीव फौज असे दोन प्रकार होते.तैनाती फौजेत बारगीर तर राखीव फौजेत शिलेदार असत.घोड्यांची निगा राखणारे-मोतद्दार. दर २ माणसांमागे तीन घोडे ठेवल्या जात होते.
- २५ घोडेस्वारांवर - १ नियंत्रक (हवालदार)
- ५ हवालदारांवर - १ जमादार
- १० जमादारांवर - १ अधिकारी (एक हजारी मनसबदार)
- ५ एक हजारी मनसबदारांवर - १ पंच हजारी मनसबदार
- सर्व पंच हजारी मनसबदारांचा अधिकारी - १ सरनोबत(सर्वोच्च अधिकारी)