Jump to content

शिवपाल सिंग

शिवपाल सिंग
वैयक्तिक माहिती
राष्ट्रीयत्व भारतीय
जन्मदिनांक ६ जुलै, १९९५ (1995-07-06) (वय: २९)
जन्मस्थानवाराणसी, उत्तर प्रदेश, भारत
खेळ
देशभारत ध्वज भारत
खेळ मैदानी खेळ
खेळांतर्गत प्रकार भालाफेक


सार्जंट [] शिवपाल सिंग ( ६ जुलै, १९९५) हा भारतीय मैदानी खेळाडू आहे. हा भालाफेक स्पर्धांमध्ये भाग घेतो. सिंग हा भारतीय वायुसेनेत सार्जंट या वरिष्ठ नॉन-कमिशन्ड ऑफिसरपदावर (SNCO) आहे.

सिंगने २०१८ आशियाई खेळांमध्ये त्याने आठवे स्थान मिळवले तर २०१९ आशियाई स्पर्धेत रौप्य पदक जिंकले.

सिंगने २०२० उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. []

बंदी घातलेले पदार्थ सेवन केल्याबद्दल सिंगला चार वर्षांसाठी खेळातून निलंबित केले गेले आहे. हे निलंबन १० ऑक्टोबर, २०२५ पर्यंत असेल. []

शिवपाल सिंग उत्तर प्रदेशातील चंदौली जिल्ह्यातील धनापूर ब्लॉक अंतर्गत हिंगुटरगढ गावात राहतो. त्याचे वडील, काका शिवपूजन सिंग आणि जगमोहन सिंग हे देखील भालाफेक करणारे आहेत. []

संदर्भ

  1. ^ "5 athletes going to Tokyo Olympics from Indian Air Force". The Bridge.
  2. ^ "Shivpal Singh becomes 2nd Indian javelin thrower after Neeraj Chopra to qualify for 2020 Tokyo Olympics". India Today (इंग्रजी भाषेत). March 11, 2020. 2021-07-26 रोजी पाहिले.
  3. ^ Mohan, K. P. (2022-10-01). "Javelin thrower Shivpal Singh suspended for four years for doping". sportstar.thehindu.com (इंग्रजी भाषेत). 2022-10-12 रोजी पाहिले.
  4. ^ Gupta, Uday (July 13, 2021). "Tokyo 2020: Javelin star Shivpal Singh ready to make India proud at upcoming Olympic Games". India Today (इंग्रजी भाषेत). 2021-07-26 रोजी पाहिले.