शिवधर्म
शिवधर्म हा एक भारतीय धर्म असून तो वैदिक परंपरेपासून फारकत असलेला आहे, आणि १२ जानेवारी २००५ रोजी सुमारे १५ लाख मराठ्यांच्या उपस्थितीत सिंदखेड राजा येथे शिवधर्माची प्रगटन झाले[१]. मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावरून या धर्माची स्थापना करण्यात आली आहे.
हिंदू धर्मामध्ये असलेल्या असमानता व चातुर्वर्ण्यापासून मुक्तीच्या विचाराने शिवधर्माची स्थापना करण्यात आली, वैदिक धर्म हा ब्राह्मणी आहे. जनमानसास संभ्रमित करून समाजात फुट पाडण्याचे ध्येय डोळ्यापुढे ठेवुन वैदिक धर्म काम करत आहे, असा विचार शिवधर्म करतो. प्रामुख्याने मराठा समाजातील व्यक्ती शिवधर्माच्या अनुयायी आहेत.
पार्श्वभूमी
आरंभीच्या रानटी अवस्थेतून मानवाच्या जीवन प्रवासाला सुरुवात झाली .निसर्गाच्या सानिध्यात अन्नाच्या मुलभुत गरजेसाठी मानवाने अवलोकन आणि आकलन याद्वारे अनेक शोध लावले.यातूनच त्याला हत्यारांची गरज भासली.ही गरजही मानवाने कालानुक्रमे उपलब्ध नैसर्गिक साधनांद्वारे पूर्ण केली.मानवी उत्क्रांतीच्या प्रत्येक टप्प्यावर मानवाची हत्यारे बदललेली दिसतात.आरंभी माणूस वस्त्रहीन होता.कालानुक्रमे त्याने वल्कले, झाडाच्या साली,मोठ मोठी पाने यांचा वस्त्र म्हणून वापर केला. कृषिचा शोध लागल्यानंतर अनेक पिके घेण्यासाठी मानवाने जंगलातिलच वान शोधून काढले.
आदिमकाली प्राथमिक मानव समाजाचे सांस्कृतिक अवशेश आजही काही वन्य वा मूलनिवासी समाजाच्या सांस्कृतिक जीवनात आढलतात. प्राचीनकाली गणव्यवस्थेत प्रत्येक कुलाचा स्वातंत्र्य परिचय व्हावा अशी कूल नामे अस्तित्वात होती.
शिवमानवाने लाखो वर्षांच्या निसर्ग साह्चार्याने स्वीकारलेल्या सांस्कृतिक आचरनातून जी शिवसंस्कृती निर्माण झाली.त्याच संस्कृतीला इतिहासकारानी सिंधूसंस्कृति असे नाव दिले आहे.
स्थापना
१२ जानेवारी २००५ रोजी सिंदखेड राजा येथे शिवधर्माची प्रगटन झाले. तेथे जमलेला १५ लाख मराठा समाजाचा समुदाय डोळे दिपवून टाकणारा होता. आपल्याला आत्मभान येऊ लागलं आहे, आपल्या अस्तित्वाचा अर्थ कळू लागला आहे,हे आपल्या वाटचालीचं मोठं यश आहे.आपण यथार्थ अभिमान बाळगावा,समाधान मानावं, कृतार्थता अनुभवावी,असं बरंच काही आता घडलं आहे, यात शंका नाही.
विचारधारा
शिवधर्माची प्राथमिक संहिता
मानवी जीवनात जे जे उदात्त,उत्तम,निकोप ,न्यायपूर्ण आणि मानवाच्या सर्व अंतःशक्ती विधायक मार्गाने फुलविनारे असे असते ते ते सर्व शिव स्वरूप असते;म्हनुनच शिवधर्म हे एका निर्मळ-निरामय समाजरचनेचे वास्तव रूप आहे. शिवधर्म हा अतिप्राचीन असून वास्तवाचे ज्ञान आणि विज्ञानाचे भान या पायावर मानवाच्या सुंदर,समृद्ध आणि परस्परपुरक जगण्यासाठीची उन्नती ही या धर्माची अनादीकालापासूनची प्रेरणा राहिली आहे.
शिवधर्म हा अत्यंत प्राचीन धर्म असल्यामुले वंश, वर्ण , जात याबाबत या धर्माने आदिम कालापासून भेदाभेद केलेला नाही किंवा या बाबतीत उच्चनीचता, न्यून-अधिकता मानलेली नाही.मानवामध्ये निसर्गतः असनारया नर आणि मादी या स्तरावर समान असनारया शिव-शक्तीच्या रूपांना स्त्री आणि पुरुषाच्या स्वरूपाकड़े "जात" म्हणून आदिमपासून पाहिले जाते.
शिवखंडात आदिम काळात निर्माण झालेली शिवसंस्कृती सिंधुसंस्कृती म्हणून अभ्यासकानी मान्य केलि.ही संस्कृती संपूर्ण शिवखंडात पसरलेली होती.त्याचे पुरावे सर्वत्र उत्खननात सापड़ले आहेत.या संस्कृतीचा धर्म हा शिवधर्म होता.असा निकोप शिवधर्म इसवी सन पूर्व १७५० पर्यंत शिवखंडात पसरलेला होता. "मराठा सेवा संघ" या मध्य भारतात स्थापन झालेल्या शिवधर्मीय चलवलिने मानवाच्या सर्वांगीं उन्नतीसाठी पुन्हा एकदा शिवधर्माचे प्रकटन केले आहे. १२ जानेवारी २००५ सिंदखेड राजा येथे शिवधर्म पीठावरून शिवधर्माचे प्रकटन करण्यात आले
जातीय अस्मितेतुन तयार झालेल्या संस्था संघटनांना जेव्हा, हिंदू संस्कृती संपवण्यात अपयश येत आहे असे दिसु लागले तेव्हा, "धर्म" या मानवी मनास भुरळ घालणा-या संकल्प्नेचा आधार घेत, काही तथाकथित विचारवंतांनी "शिवधर्म" सुरू केला. शिवाजी महाराजांच्या नावाशी साधर्म्य असल्याने सुरुवातीस अनेक लोक इकडे आकृष्ट झाले,पण यातील फोल पणा समजल्यावर या पंथाची भारतात म्हणावी इतकी प्रगती झालेली दिसुन येत नाही.[ संदर्भ हवा ]
जिजाऊ सृष्टी
जगाच्या इतिहासात २४ सप्तेम्बर २००७ हा दिवस रत्नजडित सुवर्नाक्षरात लिहीला जाईल. १२ जानेवारी २००५ रोजी वैदिक ब्राम्हणी धर्माची कोळीष्टके,जळमट झाडून सुमारे १५ लाख लोकांनी शिवधर्माचं प्रकटन केलं. शिवधर्मदिक्षेपूर्वीची तयारी म्हनून शिवधर्मपीठाची २४ सप्तेम्बर २००७ला जिजाऊसृष्टी सिंदखेडराजा (जि.बुलढाणा) महाराष्ट्र येथे विधिवत स्थापना करन्यात आली.
जिजाऊसृष्टि व शिवधर्मपीठ जिजाऊसृष्टि व शिवधर्मपीठ ,मात्रूतीर्थ सिंदखेडराजा येथे साकार होत आहे ,अंतिम मोठा प्रकल्प उभा करण्यासाठी अत्यावश्यक स्वरूपाचे मह्त्वाचे व तात्पुरते बांधकाम हाती घेतले आहे ,सुमारे २५० लाख रुपये अंदाजित किमतीच्या हया टप्प्यात खालील काही बाबिंचा समावेश आहे. १) प्रार्थना सभागृह:- १५० फुट लांब व १०५ फुट रुंदीचे आणि मध्यभागी सुमारे ४५ उंचीचे लोखंडी कमान व रंगित पत्र्याचे छत. २)शिव सेवक निवास व्यवस्था:- ३)सामुहिक निवास व्यवस्था:- ४)प्रशिक्षन केंद्र:- ५)विश्रामभवन:- ६)स्वागत व माहितीकेंद्र:- ७)स्वयंपाक व भोजनगृह:- ८)मान्यवर निवासगृहे व अभ्यासकक्ष:- ९)सामुहिक स्नानगृहे इत्यादी .....व आणखीही बरेच काही...
बहुजन समाजाच्या उद्धारासाठी शिवश्री युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर यांनी स्थापन केलेल्या शिवधर्मात लाखो बहुजन मराठा समाजाने प्रवेश केला असून यावर काव्यमय इतिहास सांगणारी शिवधमर्मगाथा पत्रकार कवी,दशरथ यादव यांनी लिहिली असून पाच हजार ओव्या लिहिण्याचा संकल्प आहे.त्यातील निम्मे काम झाले आहे. जिजाऊ शिवाचा। आहे जो बछडा। तोचिरे फाकडा। शिवधर्मी।।१।।[ संदर्भ हवा ]
संदर्भ
- ^ शिवधर्म गाथा. शिवधर्म प्रकाशन.