Jump to content

शिवदीप लांडे

शिवदीप लांडे
जन्म

शिवदीप वामनराव लांडे
२९ ऑगस्ट, १९७६ (1976-08-29) (वय: ४८)

[]
अकोला, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
शिक्षणविद्युत अभियांत्रिकी
प्रशिक्षणसंस्था •  श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, शेगांव,
 •  सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी, हैदराबाद
पेशा नागरी सेवा
धर्म हिंदू
जोडीदार ममता शिवतारे
अपत्ये
वडील वामनराव लांडे

शिवदीप वामनराव लांडे[][] हे २००६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते सध्या उपमहानिरीक्षक- कोशी रेंज, बिहार म्हणून कार्यरत आहेत.[] यापूर्वी ते दहशतवाद विरोधी पथक मुंबई, येथे पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून पाच वर्षे कार्यरत होते.[]

यापूर्वी, त्यांनी बिहारमधील अररिया, पूर्णिया आणि मुंगेर जिल्ह्यांमध्ये पोलिस अधीक्षक म्हणून काम केले आहे. पाटणा चे एसपी म्हणून त्यांचा कार्यकाळ गाजला होता होता.[] त्याकाळात त्यांनी अनेक वेगवगळ्या क्षेत्रातील गुन्हेगारांना अटक करून त्यांच्यावर कारवाई केली होती. तसेच महिलांना छेडछाड करणाऱ्यांवर कडक कारवाई केल्यामुळे देखील ते जनमानसात लोकप्रिय झाले होते.[] शिवदीप लांडे यांना लोकांनी प्रेमाने 'दबंग', 'सिंघम', 'द सुपरकॉप' अशी अनेक नावे दिलेली आहेत.[]

प्रसार माध्यमांनुसार, ते आपल्या पगारातील ६०% ते ७०% रक्कम गरीब मुलींचे सामूहिक विवाह आयोजित करणाऱ्या आणि अकोल्यातील विद्यार्थ्यांसाठी कोचिंग क्लासेस आणि वसतिगृह चालवणाऱ्या संस्थेला दान करत असतात.[][१०]

वैयक्तिक आयुष्य

शिवदीप लांडे यांचा जन्म २९ ऑगस्ट १९७६ रोजी महाराष्ट्रातील विदर्भातील अकोला जिल्ह्यात झाला. त्यांचे आई वडील हे सर्वसामान्य शेतकरी वर्गातील आहेत. त्यांनी २ फेब्रुवारी २०१४ रोजी ममता शिवतारे यांच्याशी विवाह केला, त्यांना आरा नावाची मुलगी आहे. ममता शिवतारे या विजय शिवतारे[११] माजी जलसंपदा आणि जलसंधारण राज्यमंत्री, यांच्या कन्या आहेत.

कारकीर्द

लांडे यांनी त्यांचे प्रारंभिक शिक्षण त्यांच्या मूळ गावी अकोला येथील सरस्वती विद्या मंदिर हायस्कूलमधून घेतले. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील शेगाव येथील श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयातून विद्युत अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली.[१२] हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीत प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर लांडे भारतीय पोलीस सेवेत रुजू झाले. प्रथम त्यांची भारतीय महसूल सेवांसाठी निवड झाली, नंतर ते २००६ मध्ये भारतीय पोलीस सेवेत रुजू झाले.

संदर्भ

  1. ^ "Jogbani: www.Jogbani.co.in: Shivdeep Waman Lande - Profile and Photos". Jogbani.co.in. 6 February 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-02-24 रोजी पाहिले.
  2. ^ "SP Lande Transferred; Protest in Patna". PatnaDaily.Com. 2011-11-23. 8 March 2012 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2012-02-24 रोजी पाहिले.
  3. ^ Why is Patna crying for this cop?""Why is Patna crying for this cop?". 22 February 2012 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2012-02-23 रोजी पाहिले.
  4. ^ "शिवदीप लांडे: कोसी DIG का पदभार लेते ही कहा 'हमार बिहार', अब अपराधियों की आएगी शामत!". news18. 2022-01-04 रोजी मूळ पानापासून संग्रहित. १ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
  5. ^ Saurabh Vaktania (13 January 2017). "Bihar cadre IPS officer Shivdeep Lande to head Mumbai Anti Narcotics Cell". indiatoday.in. 10 January 2019 रोजी पाहिले.
  6. ^ "IAS Paper : India's Largest Online Education & Career Guidance Portal".
  7. ^ "The Good Cop of Patna". The Indian Express. 2011-12-11. 2012-02-23 रोजी पाहिले.
  8. ^ "इस 'दबंग' IPS अफसर की आहट से कांप उठते हैं अपराधी!". India Today. 13 November 2017.
  9. ^ "Why is Patna crying for this cop?". The Times of India. 2011-12-04. 22 February 2012 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2012-02-23 रोजी पाहिले.
  10. ^ Pareek, Shabdita (18 August 2015). "Meet Shivdeep Lande, The Real-Life 'Singham' Who Donates Over Half His Salary To Charity". scoopwhoop.com.
  11. ^ "Home". vijayshivtare.com. 2020-01-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-10-02 रोजी पाहिले.
  12. ^ "Patna SP Shivdeep Lande transferred to Araria". 23 November 2011. 14 May 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 13 May 2014 रोजी पाहिले.