Jump to content

शिवणी बुद्रुक (लातूर)

  ?शिवणी बु.

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हालातूर
लोकसंख्या५,६२५ (2001)
सरपंचवैशाली पवार
कोड
पिन कोड
दूरध्वनी

• 413531
• +०२३८३

शिवणी बु. हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्याच्या दक्षिणेस वसलेले एक छोटेसे गाव आहे. या गावात गोदावरी नदीची उपनदी मांजरा व तावरजा या नद्यांचा संगम आहे.

धार्मिक स्थळे

शिवणी बु. गावात महादेव मंदिर, मारुती मंदिर, विठ्ठल मंदिर अंबाबाई मंदिर, दर्गा ही काही मुख्य धार्मिकस्थळे आहेत.

परंपरा

शिवणी बु. गावात दरवर्षी खंडोबा मंदिर येथे यात्रा भरते.

शैक्षणिक स्थान

शिवणी बु. गावात एक जिल्हा परिषद शाळा आहे. त्याशिवाय या गावात बळीराजा शिक्षण संस्था कार्यरत आहे. बळीराजा शिक्षण संस्थेचे माध्यमिक शाळा व अध्यापक महाविद्यालय आहे.

उद्योग

गावात साईबाबा शुगर्स लि. हा साखर कारखाना आहे. गावापासून ५ कि.मी. अंतरावर आहे.
त्याशिवाय गावात विकासजी ही आय.टी. कंपनी आहे. कंपनी वेब डेव्हलपमेंट, वेब होस्टिंग, ग्राफिक डिझाईनिंग क्षेत्रात कार्यरत आहे.

आर्थिक

गावात साईबाबा बँक, बळीराजा पतसंस्था आहे.

बाह्य दुवे

राजकीय स्थान

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लातूर जिल्हा कार्याध्यक्ष श्री. बबन भोसले हे शिवणी बु. गावचे आहेत.