शिवकर बापूजी तळपदे
शिवकर बापूजी तळपदे (इ.स. १८६४ - इ.स. १९१६) हे संशोधक व संस्कृत ग्रंथांचे गाढे अभ्यासक होते. यांनी सर्वप्रथम विमान उडवण्याचा यशस्वी प्रयत्न केला.[१]राईट बंधूच्या आधी ८ वर्ष म्हणजे १८९५ साली तळपदें यांनी मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर काही मिनिटे मनुष्यरहित विमान उडविले. त्या विमानाचे नाव मरुत्सखा होते.
तळपदे हे मुंबईत राहत असून त्यांना संस्कृत आणि वेदांचे अभ्यासक असलेल्या पंडित सुब्राय शास्त्री यांचे मार्गदर्शन मिळाले होते. शास्त्रींनी लिहिलेल्या वैमानिक शास्त्र या अभ्यासग्रंथावरून तळपदेंना विमान उडवण्याचा प्रेरणा मिळाली.
या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार महादेव गोविंद रानडे व तिसरे सयाजीराव गायकवाड हे होते. केसरी वृत्तपत्रातही याबद्दल उल्लेख आढळतो असे समजते .
प्रयोगानंतर हे विमान तळपदेंच्या घरी ठेवण्यात आले?.पुढील प्रयोग करण्यासाठी पैशांची निकड होती.त्यासाठी त्यांनी अहमदाबाद येथे जाऊन भाषणही दिले.तब्बल ५०,००० रुपयांची गरज होती पण ते पैसे जमले नाहीत व त्यांनी पुढील प्रयोगास स्थगिती दिली. याउलट अमेरिकी सैन्याने राईट बंधूंना २०,००० डॉलर देऊन त्यांच्या प्रयोगात मदत केली.
२०१५ मध्ये तळपदेंच्या कार्यवर आधारित हवाईजादा हा चित्रपट येऊन गेला. या चित्रपटात अत्यंत चूकीच्या पद्धतीने तळपदेंचे चरित्र रेखाटले गेले . यावर मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली . शिवकर बापूजी तळपदे लिखित प्राचीन विमानकलेचा शोध हे पुस्तकही सध्या दुर्मिळ आहे.
संदर्भ
- प्रताप वेळकर, Pāṭhāre prabhūñcā itihāsa: nāmavanta lekhakāñcyā sas̃́odhanātmaka likhāṇāsaha : rise of Bombay from a fishing village to a flourishing town, Pune, Śrīvidyā Prakāśana (1997)[१] Archived 2007-09-29 at the Wayback Machine.
- ^ Sentinels of the Sky. p. 2.